Sri Lanka : रानिल विक्रमसिंघे होणार श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

Ranil Wickremesinghe
Ranil WickremesingheSakal

कोलंबो : श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आज देशाच्या नव्या राष्ट्रपतीची निवड करण्यात आली आहे. रानिल विक्रमसिंघे आता श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती असतील. पोस्टल बॅलेटद्वारे झालेल्या मतदानात 134 खासदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. सध्या रानिल विक्रमसिंघे हे काळजीवाहू अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते.

Ranil Wickremesinghe
शिंदे सरकार अवैध; ठाकरेंच्या पक्षाने मांडलेले महत्त्वाचे मुद्दे

रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) हे १९९४ पासून युनायटेड नॅशनल पार्टीचे प्रमुख आहेत. ते आतापर्यंत चारवेळा श्रीलंकेचे पंतप्रधान झाले आहेत. महिंदा राजपक्षे २०२० मध्ये पंतप्रधान होण्याआधी रानिल हे श्रीलंकेचे (Sri Lanka) पंतप्रधान होते. रनिल यांनी ७० च्या दशकात राजकारणात प्रवेश केला होता. १९७७ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. १९९३ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान होण्यापूर्वी रानिल यांनी उपपरराष्ट्र मंत्री, युवा आणि रोजगार मंत्री यासह इतर अनेक मंत्रालये सांभाळली आहेत.

Ranil Wickremesinghe
Agneepath Scheme : 'अग्निपथ'विरोधातील याचिकेवरील सुनावणी पुढं ढकलली

राष्ट्रपतीपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे, दुल्लास अल्हपेरुमा आणि अनुरा कुमारा डिसनायके अशी तीन नावे प्रस्तावित करण्यात आली होती. अल्हपेरुमा हे कट्टर सिंहली बौद्ध राष्ट्रवादी आणि सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP) पक्षाचे सदस्य आहेत. दुसरीकडे, डिसनायके हे डावे जनता विमुक्ती पेरामुनाचे (JVP) प्रमुख सदस्य आहेत. गोटाबाया यांची जागा घेणाऱ्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा नोव्हेंबर 2024 पर्यंत असणारअसून, नव्या राष्ट्रपतींसमोर श्रीलंकेत उद्भवलेली अद्भूतपूर्व परिस्थीती पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे मुख्य आव्हान असणार आहे. कारण सध्या येथील 22 दशलक्ष लोकांना अन्न, इंधन आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com