शिंदे सरकार अवैध; ठाकरेंच्या पक्षाने मांडलेले महत्त्वाचे मुद्दे

आमदार अपात्रता आणि सत्तांतर या महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होती.
Maharashtra New CM Eknath shinde from Satara dare village Mahabaleshwar
Maharashtra New CM Eknath shinde from Satara dare village Mahabaleshwarsakal
Updated on

देशभराचं लक्ष लागून असलेल्या शिंदे ठाकरे प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंनी तगड्या वकिलांची फौज उभारली होती. दरम्यान, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आता पुढची तारीख दिली आहे. तोवर राज्यातली परिस्थिती जैसे थेच राहणार आहे. (Maharashtra Politics Supreme court hearing)

Maharashtra New CM Eknath shinde from Satara dare village Mahabaleshwar
Thackeray Vs Shinde : सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान काय घडलं? वाचा

आमदार अपात्रता आणि सत्तांतर या महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी ही सुनावणी होती. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) बाजूने कपिल सिब्बल (Kapil Sibbal) हे युक्तिवाद करत होते. यामध्ये त्यांनी संविधानाचा दाखला देत शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र असल्याचं सांगितलं. तसंच नव्या सरकारला राज्यपालांनी दिलेली शपथही अवैध असल्याचं ठाकरे गटाकडून मांडण्यात आलं आहे.

Maharashtra New CM Eknath shinde from Satara dare village Mahabaleshwar
शिवसेनेसोबत मनसेचीही अस्तित्वाची लढाई; राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये

सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाने केलेला युक्तिवाद

  • महाराष्ट्रातल्या सत्तांतरामध्ये संविधानाच्या दहाव्या सूचीतल्या तरतुदींचं उल्लंघन झालं आहे.

  • दहाव्या सूचीनुसार, आमदारांनी व्हीपचं उल्लंघन केल्याने शिंदे गटाचे ४० आमदार अपात्र ठरत आहेत.

  • प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्यपालांची कृती अवैध

  • नव्या सरकारला दिलेली शपथ अवैध

  • अपात्र आमदारांकडून झालेली विधानसभा अध्यक्ष निवड अवैध

  • अधिकृत व्हीप असताना दुसऱ्या व्हीपला मान्यता देणं अयोग्य

  • निवडणूक आय़ोगाकडे दाद मागण्याचा शिंदे गटाचा (Eknath Shinde) प्रयत्न अवैध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com