Viral Comments: सोमवार आठवड्यातील सर्वात वाईट दिवस; नेटकऱ्यांच्या स्मार्ट प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Comments

Viral Comments: सोमवार आठवड्यातील सर्वात वाईट दिवस; नेटकऱ्यांच्या स्मार्ट प्रतिक्रिया

GWR: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने नुकतीच सोमवारी सोमवार या दिवसाची आठवड्यातील वाईट दिवस म्हणून नोंद केली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने यांसंबंधित एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनंतर सोशल मीडिया युजर्स खुश झाले आहेत. तसेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. एका यूजरने GWR ला स्मार्ट म्हटले आहे तर दुसऱ्या युजरने चक्क सोमवारला बॅन करण्याची याचिका दाखल करण्याची मागणी करणारी प्रतिक्रिया दिली आहे.

सोमवार दिवस कायम लोकांसाठी ठरतो कठीण

सोमवारी जास्तीत जास्त लोकांची परत नव्याने काम सुरू करण्याची इच्छा नसते. तसेच अनेकांना तर रविवारची सुट्टी संपल्यानंतर सोमवारी अभ्यास करण्याचीही इच्छा नसते. सोमवारचा आळस दूर करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि इन्फ्यूएंसरसुद्धा मंडे मोटिवेशनसाठी तुमचं आवडत्या लाइफ गोलवर फोकस करण्याचं सजेशन देतात.

हेही वाचा: Viral Video : दिवाळीतील स्वच्छतेचे भूत! पुसण्याऐवजी पाण्याने धुतल्या 'या' वस्तू

१९९५ साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची सुरूवात झाली

GWR ला पहिल्यांदा २७ ऑगस्ट १९५५ प्रकाशित केल्या गेलं. याला सुरू करण्याचं श्रेय ब्रिटीश-दक्षिण आफ्रिकी इंजीनियर सर हह बीवरला जातं. १९९९ पर्यंत GWR गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नावाने ओळखल्या जायचं. या बुकमध्ये प्रत्येक मानवी आणि नैसर्गिक किर्तीस पात्र गोष्टींची नोंद केल्या गेली आहे.