'भारतामुळे प्रादेशिक स्थैर्याला बाधा'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

इस्लामाबाद : दक्षिण आशियामध्ये "क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रम' आणि "आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचणी' राबविणे म्हणजे प्रादेशिक स्थैर्याला बाधा आणण्यासारखे आहे, अशी तक्रार पाकिस्तानने आज क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटाकडे (एमटीसीआर) केली. या वेळी त्यांचा सर्व रोख भारताकडे होता.

"एमटीसीआर' या प्रभावशाली गटामध्ये भारताचा नुकताच समावेश करण्यात आला आहे. या गटाचे शिष्टमंडळ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून त्यांच्यासमोर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताची कागाळी करण्याची संधी साधली. दक्षिण आशियाची शांतता भंग करू शकणाऱ्या या घटना "अत्यंत गंभीर' असल्याचे या गटाला सांगितल्याचे पाकिस्तानने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात यशस्वी झालेला भारत हा दक्षिण आशियातील एकमेव देश आहे. "इतर देशांमुळे शांततेला धोका निर्माण होत असला तरी पाकिस्तान मात्र या शस्त्रस्पर्धेपासून दूर आहे. यामुळेच दक्षिण आशियामध्ये धोरणात्मक निर्बंध आणण्याची यंत्रणा उभारावी, अशी पाकिस्तानची मागणी आहे. प्रादेशिक वाद सोडविण्यासाठी चर्चेचेच माध्यम उपयुक्त आहे,' असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: regional stability affected by india, claims pakistan