esakal | कोरोनापासून बचावासाठी शाळेने लढवली शक्कल!
sakal

बोलून बातमी शोधा

reopens schools after corona virus havoc with strict rules at iran

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे जगभरातील अनेक शाळा अद्यापही बंद आहेत. काही देशांनी कडक अटींवर शाळा सुरू केल्या आहेत.

कोरोनापासून बचावासाठी शाळेने लढवली शक्कल!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

तेहराण (इराण): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे जगभरातील अनेक शाळा अद्यापही बंद आहेत. काही देशांनी कडक अटींवर शाळा सुरू केल्या आहेत. इराणमधील काही भागातील शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांना एका नेटमध्ये बसणे बंधनकारक केले आहे.

चीनी सैनिक धारदार शस्त्रे घेऊन सीमेवर उभे

इराणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. देशात सुमारे 7 महिन्यांनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या असून, सर्वसाधरणपणे दीड कोटी मुले शाळेत परतली आहेत. परंतु, ज्या भागात कोरोनाचे कमी संक्रमण आहे, अशा ठिकाणीच हे शक्य झाले आहे. शिवाय, शाळेमध्येही अत्यंत कडक नियम करण्यात आले आहेत. शाळांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी शक्कल लढवली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर एक अट घालण्यात आली आहे की, मुलांना विशिष्ट प्रकारच्या एका नेटमध्ये बसणे बंधनकारक आहे. आणि त्यांना त्याच पद्धतीने अभ्यास करावा लागेल.

Video: पाकची युवती म्हणतेय; ट्रम्पच माझे बाबा...

विद्यार्थ्यांना काही शाळांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खास डिझाइन केलेल्या जाळ्यामध्ये बसावे लागते आहे. जाळी सर्व बाजूंनी पूर्णपणे बंद आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक वेगळे जाळे तयार करण्यात आले आहे. इराणच्या रेड झोनमध्ये संक्रमणाचे प्रमाण विशेषत: जास्त आहे आणि तेथे शाळा बंद आहेत. तेहरानसह यलो झोनमध्ये संक्रमणाचा धोका जास्त असला तरी ते रेड झोनच्या तुलनेत कमी आहे. यलो झोनमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबतचा निर्णय पालकांवर सोडण्यात आला आहे. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवलेले नाही. पण, जे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत त्यांना व्हर्च्युअल पद्धतीने शिकवले जाते. इराणी प्रशासनाने व्हर्च्युअल अभ्यासासाठी कडक नियम लावले आहेत. या शाळा फक्त 35 मिनिटांसाठी शिकवतात. व्हर्च्युअल वर्ग केवळ सरकारी टीव्ही चॅनेलवर प्रसारित केले जातात.