ब्रिटनमधील बॅंकेत पडून असलेल्या निधीबाबत पुन्हा याचिका दाखल

यूएनआय
Friday, 24 July 2020

ब्रिटनमधील बॅंकेत पडून असलेल्या निधीबाबत लंडनच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आव्हान देण्यासाठी हैदराबादच्या निजामच्या अन्य वंशजांनी पुन्हा याचिका दाखल केली आहे. मात्र न्यायालयाने निधीबाबत पुन्हा सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने यापूर्वी निजामाचे आठवे वंश आणि भारत सरकारला यातील काही रक्कम देण्याचा निर्णय दिला होता.

लंडन- ब्रिटनमधील बॅंकेत पडून असलेल्या निधीबाबत लंडनच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आव्हान देण्यासाठी हैदराबादच्या निजामच्या अन्य वंशजांनी पुन्हा याचिका दाखल केली आहे. मात्र न्यायालयाने निधीबाबत पुन्हा सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने यापूर्वी निजामाचे आठवे वंश आणि भारत सरकारला यातील काही रक्कम देण्याचा निर्णय दिला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लंडनमधील रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायाधीश मार्क्‍स स्मिथ यांनी गेल्या वर्षी या प्रकरणावर सुनावणी केली होती. फाळणीनंतर हैदराबादच्या सातव्या निजामाच्या आर्थिक संपत्तीवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरू होते. गेल्या वर्षी भारत सरकार व निजामाचे आठवे वंशज आणि इतर भावांच्या बाजूने लंडनच्या न्यायालनाने निर्णय दिला होता. मात्र याला अन्य वंशजांचा विरोध आहे.

कुलभूषण जाधव यांच्या मदतीचे सर्व मार्ग पाकिस्तानने रोखले!

वंशज नजफ अली खान आणि सातव्या निजामाच्या इतर उत्तराधिकाऱ्यांनी या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. तसेच सातव्या निजामाच्या प्रशासकांवर फसवणुकीचा आरोप लावला आहे. खान यांनी याचिकेत म्हटले आहे की न्यायालयाने भारत आणि अन्य दोघा निजामाच्या वंशजांना हा पैसा दिला आहे. आपण सध्या आर्थिक संकटात आचा सामना करावा लागत आहे. 

न्यायाधीश स्मिथ यांनी मात्र निधी प्रकरणावर पुन्हा सुनावणी घेण्यास नकार दिला.  मी यापूर्वीच या प्रकरणावर निकाल दिला असून, आता त्यावर पुन्हा प्रक्रिया अशक्‍य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repetition for funds lying in UK bank