बायडेन यांची उमेदवारी तडजोडीतून; डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

पीटीआय
Wednesday, 14 October 2020

ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक तडजोडी केल्या, असा आरोप रिपब्लिकनचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. 

वॉशिंग्टन -  ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक तडजोडी केल्या, असा आरोप रिपब्लिकनचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. कोरोनावर मात केल्यानंतर प्रथमच फ्लोरिडा येथे सोमवारी रात्री आयोजित सभेत ट्रम्प बोलत होते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अध्यक्षपदाच्या निवडणुकीला जेमतेम वीस ते बावीस दिवस राहिले आहेत. मध्यंतरी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोविड झाल्याने व्हर्च्युअल सभेवर भर दिला जात होता. आता कोरोनातून बरे झाल्यानंतर सोमवारी फ्लोरिडात ट्रम्प यांची सभा झाली. हजारो समर्थकांच्या उपस्थिततीत बोलताना ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुक ऐतिहासिक असल्याचे म्हटले. ही निवडणुक जिंकायलाच हवी कारण प्रतिस्पर्धी लोक हेकेखोर आहेत, असे टम्र्प म्हणाले. डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी ज्यो बायडेन यांनी समाजवादी, मार्क्सवादी आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या हाती डेमोक्रॅटिक पक्ष सोपवला. त्यांच्याकडे आता शक्तीच राहिली नाही, असेही ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republican President Donald Trump made the allegations joe biden candidacy compromised