संशोधक म्हणतात, 'कोरोना व्हायरस हा नैसर्गिकच!'

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 मार्च 2020

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वुहानमधून कोरोनाचा सर्वत्र प्रसार झाल्यानंतर संशोधकांनी यावर अभ्यास सुरू केला.

वॉशिंग्टन : कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेत जेनेटिक इंजिनिअरिंगच्या माध्यमातून तयार केला असल्याच्या काही देशांच्या आरोपांचे संशोधकांनी खंडन केले आहे. या विषाणूचा उगम निसर्गातच असल्याचा दावा त्यांनी केला असून, त्याबाबतची माहिती ‘नेचर मेडिसिन’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

येथील स्क्रिप्स संशोधन संस्थेतील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. गेल्या वर्षी चीनमधील वुहान शहारातून सर्वत्र पसरलेला ‘कोविड-१९’ हा विषाणू प्रयोगशाळेतून नव्हे, तर निसर्गचक्रातून बाहेर पडला असल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. हा विषाणू प्रयोगशाळेत तयार केला गेल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Coronavirus : कोरोनाची लस शोधण्यात संशोधकांना यश; चाचणीत दिसले सकारात्मक परिणाम!

‘कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांच्या उपलब्ध गुणसूत्रांचा अभ्यास केला असता, तो निसर्गनिर्मितच असल्याचे दिसून येत आहे, असे संशोधन संस्थेतील प्रा. क्रिस्टीअन अँडरसन यांनी सांगितले. कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण २००३ मध्ये चीनमध्ये आढळला होता. यामुळे चीनमध्ये ‘सार्स’ची साथ पसरली होती. या विषाणूमुळे दुसरी साथ २०१२ मध्ये सौदी अरेबियात आली होती.

- हुश्श : चीनमध्ये नवा संसर्ग नाही; पण एक चिंता कामय, जाणून घ्या जगात कोठे काय घडले?

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वुहानमधून कोरोनाचा सर्वत्र प्रसार झाल्यानंतर संशोधकांनी यावर अभ्यास सुरू केला. पूर्वीपेक्षा यंदा या विषाणू वेगाने पसरण्याचे कारण म्हणजे संसर्गग्रस्त लोकांचा इतर लोकांशी वाढलेला संपर्क हे आहे, असे संशोधकांनी सांगितले.

- कच्च्या तेलाला मिळाला १६ वर्षांतील सर्वात कमी दर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Researchers claim the corona virus originated by nature