कच्च्या तेलाला मिळाला १६ वर्षांतील सर्वात कमी दर!

Petrol-Diesel
Petrol-Diesel

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जगभरात दहशत माजवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच क्षेत्रांवर वेगवेगळे परिणाम होत आहेत. देशांतर्गत व्यापार, दळणवळण थंडावले आहेत. परिणामी, कच्च्या तेलांच्या किंमतीही दिवसेंदिवस कमी होऊ लागल्या आहेत. 

मागणी घटल्याने गेल्या तीन दिवसांपासून सतत कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत चालली होती. त्यामुळे कच्च्या तेलाच्या इतिहासात नवनवे विक्रम नोंदविले गेले आहेत. बुधवारी (ता.१८) कच्च्या तेलाला गेल्या १६ वर्षातील निच्चांकी दर मिळाला आणि हा एक नवा रेकॉर्ड ठरला. 

मात्र, तरीही भारतातील तेल उत्पादक कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतेही बदल केलेले नाहीत. दिल्लीत पेट्रोलचा दर ६९.५९ रुपये प्रति लिटर एवढा आहे. कोरोना व्हायरसचा विस्फोट होऊ लागल्यानंतर पेट्रोलच्या किंमतीत वाढ होऊ लागली होती. २७ फेब्रुवारीपासून याच्या किंमतीत सतत घसरण होत गेली. मात्र, ही घसरण आज थांबल्याचे दिसून आले. 

शहर पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
दिल्ली  ६९.५९ ६२.२९
मुंबई ७५.३० ६५.२१
कोलकाता ७२.२९ ६४.६२
चेन्नई ७२.२८ ६५.७१
नोएडा ७२.०३ ६२.९६

११ जानेवारीला या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात जास्त दर नोंदविला गेला होता. दिल्लीत ७६.०१ रुपये प्रति लिटर दराने पेट्रोलची विक्री केली जात होती. 

११ लाख बॅरलने मागणी घटली

गोल्डमेन एक्सच्या माहितीनुसार, जगभरातील सर्वच देशांतील सरकार लोकांना गर्दीपासून दूर राहा किंवा घरीच बसून राहण्याच्या सूचना करत आहे. त्यामुळे दळणवळण पूर्णपणे बंद होत चालल्याचे चित्र दिसत आहे. मार्च अखेरपर्यंत ८०-९० लाख बॅरल एवढी कच्च्या तेलाची मागणी होत असल्याची नोंद होत होती. मात्र, ही मागणी जवळपास ११ लाख बॅरल एवढी घटली असून हा एक विक्रम बनला आहे. 

२० डॉलरपर्यंत खाली येणार दर

कोरोनामुळे तेलाची मागमीच घटल्याने कच्च्या तेलाची किंमत २० डॉलर पर्यंत खाली येऊ शकते, असा अंदाज गोल्डमेनने वर्तविला आहे.

SMS द्वारे जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज कमी-जास्त होत राहतात. सकाळी ६ वाजता त्याची आजची किंमत निश्चित केली जाते. त्यामुळे आज तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलची किंमत काय आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या क्रमांकांवर RSP असा एसएमएस पाठवा. आणि जाणून घ्या. 
इंडियन ऑईल - ९२२४९९२२४९
बीपीसीएल - ९२२३११२२२२
एचपीसीएल - ९२२२२०११२२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com