esakal | कोरोना विषाणूच्या 'ग्लोबल हॉटस्पॉट्स'बाबत संशोधकांचा महत्वाचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

Horseshoe bat

कोरोना विषाणूच्या 'ग्लोबल हॉटस्पॉट्स'बाबत संशोधकांचा महत्वाचा दावा

sakal_logo
By
अमित उजागरे

वॉशिंग्टन : वनांचं विखंडन, कृषी विस्तार आणि केंद्रीत पशुधन उत्पादन यांसारखी ठिकाणं हॉर्सशू बॅट या प्रजातीच्या वटवाघुळांसाठी अनुकूल हॉटस्पॉट ठरत आहेत. अशा ठिकाणी ही वटवाघळं कोरोना विषाणू पसरवण्याच काम करु शकतात. या ठिकाणी माणसांचा कायम वावर असल्यानं कोरोना विषाणू माणसांमध्ये संक्रमण करु शकतो, हे एक ताजं संशोधन झालं आहे. या संशोधनाचा निष्कर्ष कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले, पॉलिटेक्निको डी. मिलानो आणि न्यूझीलंडचं मैसी विद्यापीठातील संशोधकांद्वारे प्रकाशित करण्यात आलं होतं. (Researchers reveal global hotspots where new coronaviruses may emerge)

हेही वाचा: कोरोनानं मृत्यु झालेल्या 'एसटी' कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची मदत

SARS-CoV-2 अर्थात कोरोना विषाणूचा नेमकी उत्पत्ती कशी झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, "हा आजार तेव्हा समोर आला जेव्हा हा विषाणू हॉर्सशू बॅट या वटवाघुळांच्या प्रकारामध्ये संक्रमित झाला. हा कोरोनाचा विषाणू वन्यजीवांच्या माध्यमातून मानवाच्या संपर्कात येऊन त्यांच्यात संक्रमित होण्यास सक्षम होता.

प्राण्यांचा नैसर्गिक आधिवास धोक्यात आल्यानं कोरोनाचा धोका वाढला

नव्या संशोधनात वनांचं विखंडन, कृषी आणि पशुधन उत्पादनं होत असलेली ठिकाणं वटवाघुळाच्या निवासासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाच्या विषाणूचा माणसांमध्ये संक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी ठिकाणं सहजपणे कोरोना हॉटस्पॉट बनू शकतात. पर्यावरण विज्ञानाचे प्राध्यापक आणि या संशोधनाचे सहलेखक पाओलो डी ओडोरिको यांनी म्हटलं की, "वन्य जमिनींचा अनिर्बंध वापर हा मानवाच्या आरोग्यावर परिणाम करु शकतो. कारण प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात मानवाचं अतिक्रमण झाल्यानं विशिष्ट आजारांचा फैलाव होऊ शकतो."

इबोलाच्या प्रकोपालाही ठरला कारणीभूत

दरम्यान, हॉर्सशू बॅट ही वटवाघूळांची एक सामान्य प्रजाती आहे. ही प्रजाती कायम मानवी भागात आढळून येते. रुली डी ओडिरिको आणि संशोधनाचे सहलेखक डेव्हिड हेमैन यांनी यापूर्वी केलेल्या संशोधनात अफ्रिकेत झालेल्या वनांच्या विखंडनामुळे प्राण्यांचे अधिवास नष्ट होऊन इबोला आजाराचा प्रकोप झाल्याचा दावा केला होता.

loading image
go to top