Rhetan TMT Share Price
Rhetan TMT Share Priceesakal

Rhetan TMT Share Price : मार्केट डाऊन तरीही या शेयरला काही नाही नुकसान; तीन महिन्यात झाली सातपट कमाई

शेयर मार्केट म्हटलं की प्रत्येकाचे कान टवकरतात

Rhetan TMT Share Price : शेयर मार्केट म्हटलं की प्रत्येकाचे कान टवकरतात. शेयर मार्केटचे अपडेट ठेवूनच गुंतवणूक करता येते, रोज सकाळी उठल्यावर आधी स्टॉक्स मार्केट बघाव ही सवय तुम्हाला असेल किंवा तुम्ही ती इतरांमध्ये बघितलीही असेल.

Rhetan TMT Share Price
Amazon Prime Gaming : Amazon ने भारतात लाँच केलं दमदार गेमिंग ॲप! आता गेम खेळा फ्री ऑफ कॉस्ट

कोरोनाच्या दणदणाटामुळे शेअर बाजारात घसरण सुरूच असली तरी, काही गुंतवणूकदार एका कंपनीचे शेअर्स खरेदी करत आहेत आणि का करू नये, अवघ्या तीन महिन्यांत या शेयरने 710% एवढा जबरदस्त रिटर्न दिला आहे. आता कंपनीने बोनस आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे.

Rhetan TMT Share Price
Holiday Calendar 2023 : पुढचं वर्ष खाणार सगळ्या सुट्ट्या; वीकेंडलाच आले आहेत सगळे सण

ही कंपनी TMT आणि बांधकामात वापरल्या जाणार्‍या राउंड बारची उत्पादक आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात तिचा नेट प्रॉफिट 2.35 कोटी रुपये होता. शेअर्समधल्या या तेजीनंतर कंपनीने बोनस आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे.

Rhetan TMT Share Price
Kashid Beach : एका रोमांचक अशा शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? या ठिकाणी प्लॅन करू शकता

Rhetan TMT स्टॉक 4% पर्यंत वाढला

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण सुरूच राहिली. शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी लाल चिन्हावर बंद झाले. पण असं असूनही, Rhetan TMT, TMT Sariya विकणाऱ्या SME कंपनीच्या शेयर्सने इनवेस्टर्स बरेच लक्ष वेधून घेतले. शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे, इंट्रा-डेमध्ये जवळपास 4 टक्क्यांनी उसळी घेतली आणि 469.50 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला.

Rhetan TMT Share Price
Pregnency Tips : अजब नियम! बाळंतपणात रडण्या-ओरडण्यावर आहे बंदी

कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ

उच्चांक गाठल्यानंतर, Rhetan TMT च्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण झाली. पण, व्यवहाराच्या शेवटी, जिथे सेन्सेक्स आणि निफ्टी तोट्याने बंद झाले, तिथे या कंपनीचे शेअर्स जवळपास 2 टक्क्यांनी वाढून 456 रुपयांवर बंद झाले. गेल्या तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 710 टक्क्यांचा जबरदस्त रिटर्न दिला आहे.

Rhetan TMT Share Price
Love Life : ब्रेकअप नंतर काही लोक यशस्वी का होतात?

तीन महिन्यांपूर्वी ही किंमत होती

देशांतर्गत शेअर बाजारावर कोरोना विषाणूचे सावट असतानाही या शेअरबाबत गुंतवणूकदारांचा कल दिवसेंदिवस वाढतो आहे. गेल्या तीन महिन्यांतला RHETAN TMT शेअरच्या किंमतीतील बदल बघितलं तर, 5 सप्टेंबर 2022 रोजी बाजार बंद झाल्यावर या शेअरची किंमत 66.50 रुपये होती आणि गुरुवार, 22 डिसेंबर 2022 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत रु.456 वर पोहोचली आहे.

Rhetan TMT Share Price
Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणारी कुळीथ पिठी कशी तयार करायची?

कंपनीने बोनस जाहीर केला

Rhetan कंपनी TMT आणि बांधकामात वापरल्या जाणार्‍या राउंड बारची निर्माती आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात त्याचा नेट प्रॉफिट 2.35 कोटी रुपये होता. शेअर्समध्ये तेजीनंतर कंपनीने बोनस आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनी 4 ऐवजी 11 बोनस शेअर जाहीर करेल. कंपनीचे बाजार भांडवल (MCap) 964.75 कोटी रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com