अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्रातील नोबेल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

स्टॉकहोम, स्वीडन : अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्र या विषयातील 'बिहॅव्हरीअल इकॉनॉमिक्स'मधील योगदानाबद्दल 2017 चे अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आले आहे. रिचर्ड थेलर यांनी आर्थिक आणि मानसिक गोष्टींचा व्यक्तींच्या वैयक्तिक निर्णय घेण्याच्या क्षमतेवर काय आणि कसा परिणाम होतो याबद्दल विश्लेषण केले आहे. त्यांच्या याच विषयातील योगदानाबद्दल रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने नोबेल देऊ केला असल्याचे आज (सोमवार) सांगितले.

थेलर यांच्या 'बिहॅव्हरीअल इकॉनॉमिक्स' विषयातील मानवी वर्तणुकीशीसंबंधित अभ्यासामुळे अर्थशास्त्राच्या नवीन आणि वेगाने विस्तारलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. शिवाय त्यांनी केलेल्या संशोधनाचा आर्थिक शोध आणि धोरणांवर मोठा प्रभाव पडणार आहे."

अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचे नाव देखील चर्चेत होते. आतापर्यंत 78 अर्थतज्ज्ञांना अर्थशास्त्राचे नोबेल देण्यात आले आहे.

Web Title: Richard Thaler Awarded Nobel in Economics