esakal | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची आज अवकाश सफर
sakal

बोलून बातमी शोधा

Jeff Bezos

ब्लू ओरिजन आणि अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस आज लहानपणी पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण करणार आहे. 20 जुलैला ते अंतराळ प्रवास करणार आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची आज अवकाश सफर

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- ब्लू ओरिजन आणि अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस आज लहानपणी पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण करणार आहे. 20 जुलैला ते अंतराळ प्रवास करणार आहेत. जेफ बेझोस यांच्याआधी प्रसिद्ध उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन यांचे अवकाश भ्रमण यशस्वी केले आहे. त्यामुळे अवकाशात सफर करणारा पहिला अब्जाधिश ठरण्याची त्यांची संधी हुकली आहे. तरी बेजोस यांच्या अवकाश सफरीकडे सर्व जगाचं लक्ष लागलंय. ब्लू ओरिजिन (Blue Origin) या त्यांच्या कंपनीने विकसित केलेल्या रॉकेटमधून ते मंगळवारी अवकाश उड्डाण करणार आहेत. (richest peroson on earth Jeff Bezos is Going to Space Blue Origin rocket space race)

जेफ बेजोस त्यांच्या भावासोबत अंतराळात जाणार आहेत. ब्लू ओरिजिन कंपनीकडून पाठविण्यात येणाऱ्या पहिल्या मानवसहित स्पेस फ्लाइटचा जेफ बेजोस हे एक हिस्सा आहेत. विशेष गोष्ट म्हणजे अॅमेझॉन कंपनीचे सीईओ पद सोडल्याच्या 15 दिवसानंतर जेफ बेजोस अंतराळात जात आहेत. अमेरिकेतील टेक्सासमधील लॉंचिंग पॅडवरुन न्यू शेफर्ड नावाचे अंतराळयान अवकाशात आज उड्डाण करेल. पृथ्वीपासून 80 किलोमीटरवर गेल्यावर रॉकेट आणि कॅप्सुल एकमेकांपासून वेगळे होईल. याठिकाणाहून कॅप्सुल अंतराळाच्या कक्षेत पोहोचेल.

हेही वाचा: मोठा दिलासा! अमेरिकेकडून भारतासाठी प्रवास नियम शिथिल

माहितीनुसार, कॅप्सुल गुरुत्वाकर्षणरहित स्थितीत चार मिनिटापर्यंत अवकाशात राहील, त्यानंतर ते पृथ्वीवर परतेल. कॅप्सुलला पॅराशूट लावण्यात आले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर हे पॅराशूट उघडेल. टेक्सासच्या वाळवंटात हे कॅप्सुस उतरेल. या संपूर्ण प्रवासाचा थरार 11 मिनिटाचा असेल असं सांगण्यात आलं आहे. बेजोस यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये ते म्हणाले होते की, ''मी पाच वर्षाचा होतो, त्यावेळी अंतराळात जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं. येत्या 20 जुलै रोजी मी माझ्या भावासह हा प्रवास करणार आहे. माझ्या सर्वात चांगल्या मित्रासोबत या साहसी मोहिमेवर अंतराळात जाणार आहे.''

हेही वाचा: बकरी ईदनिमित्त निर्बंधात सूट; SC ने केरळ सरकारला फटकारले

दरम्यान, मे महिन्यातच ब्लू ओरिजिन कंपनीने ही घोषणा केली होती. बेजोस बंधू 11 मिनिटे अंतराळात राहून पृथ्वीवर परतणार आहेत. बेझोस यांची घोषणा अनेकांना चकित करून गेली. कारण टेस्लाचे संस्थापक ऐलॉन मस्क गेल्या काही दिवसांपासून अंतराळ आणि मंगळावर जाण्यावरून चर्चेत होते. पण त्यांच्या आधी बेझोस अंतराळात जाणार आहेत. मागील आठवड्यात रिचर्ड ब्रॅन्सन अवकाशात गेले होते. त्यामुळे अब्जाधीशांची 'स्पेस रेस' सुर असल्याचं पाहायला मिळतंय.

loading image