लस न घेतल्यास पुन्हा संसर्गाचा धोका; ‘सीडीसी’च्या अभ्यासातील निरीक्षण

 corona vaccination
corona vaccinationEsakal

न्यूयॉर्क : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून संरक्षण मिळविण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. या लशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनाही लस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना पुन्हा कोरोना होण्याची दुप्पट धोका आहे, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

 corona vaccination
Afghanistan: गृहयुद्ध चिघळले! ब्रिटनने नागरिकांना मायदेशी बोलावले

‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) या संस्थेचा एक अभ्यास अहवाल शुक्रवारी (ता. ६) केंटुकी येथे जाहीर झाला आहे. कोरोनाचा नवा व अधिक संसर्गक्षम डेल्टा प्रकारामुळे लसीकरण करण्याचे आवाहन यात शास्त्रज्ञांनी नागरिकांना केले आहे. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशांनाही लस घ्यावी, असा सल्लाही अहवालातून दिला आहे. लसीकरणामुळे शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होत असल्याचे पुरावे प्रयोगशाळेत मिळाले आहेत. विषाणूच्या नव्या प्रकारापासून लशीमुळे संरक्षण मिळत आहे, असेही त्यात म्हटले आहे.

 corona vaccination
नीरज चोप्राची भालाफेकीत सुवर्ण कामगिरी; पाहा व्हिडिओ

‘‘जर तुम्हाला आधी कोरोना झाला असला तरी लस घ्‍या. विशेषतः विषाणूच्या डेल्टा हा अधिक धोकादायक प्रकार फैलावला असताना तुम्ही स्वतः आणि तुमच्या संपर्कातील लोक सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण हा उत्तम उपाय आहे,’’ असे आवाहन ‘सीडीसी’चे संचालक डॉ. रोशेल वॉलेन्स्की यांनी केले आहे. नव्या प्रकाराने पुन्हा संसर्ग होण्याबाबत माहिती फारशी नाही. पण अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ब्रिटनमधील आकडेवारीचा आधार घेत ‘अल्फा’ प्रकारापेक्षा ‘डेल्टा’मुळे पुन्हा संसर्गाचा धोका उद्‍भवू शकतो, असे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे.

विषाणूच्या प्रकारांपासून बचाव शक्य

‘‘लशीमुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमधील रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होण्यास मदत होते, या कोणताही संशय नाही. लसीकरणामुळे तुम्ही केवळ कोरोना विषाणूच नाही तर त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांपासूनही संरक्षण मिळवू शकता,’’ असे संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. अँथोनी फाउसी यांनी व्हाइट हाउसमध्ये नुकतेच केलेल्या निवेदनात म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com