piyush goyal
sakal
बर्लिन - कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्समुळे अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत असला तरी मानवी सर्जनशीलता, अनुभव आणि कौशल्याची जागा यंत्रे पूर्णपणे घेऊ शकणार नाहीत. मुंबईतील आपल्या आवडीची पावभाजी रोबोट बनवू शकतो; मात्र रोज त्याच चवीची पावभाजी मिळत राहिल्याने त्याचा कंटाळा येईल. वैभव सूर्यवंशीच्या शैलीत सिक्सर मारण्याचे कौशल्य रोबोटला कधीच आत्मसात करता येणार नाही, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी येथे सांगितले.