Video: मोटार चालवत असताना साप लागला डुलायला

वृत्तसंस्था
Monday, 28 September 2020

मोटारीच्या इंजिनमध्ये अथवा चाकांमध्ये साप बसलेला आढळतो. पण, मोटार चालवत असताना शेजारी साप दिसला तर? या विचारानेच घाबरगुंडी उडेल. एक महिला मोटार चालवत असताना साप इकडे-तिकडे पाहात डुलत होता. महिलेने धाडस दाखवून मोटार एका ठिकाणी थांबवली. सर्पमित्राने नागाला अलगद बाहेर काढून सुरक्षितस्थळी सोडले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सिडनी (ऑस्ट्रेलिया): मोटारीच्या इंजिनमध्ये अथवा चाकांमध्ये साप बसलेला आढळतो. पण, मोटार चालवत असताना शेजारी साप दिसला तर? या विचारानेच घाबरगुंडी उडेल. एक महिला मोटार चालवत असताना साप इकडे-तिकडे पाहात डुलत होता. महिलेने धाडस दाखवून मोटार एका ठिकाणी थांबवली. सर्पमित्राने नागाला अलगद बाहेर काढून सुरक्षितस्थळी सोडले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

साप, युवक आणि अजगराचा धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

अँड्र्यू स्नेक रिमुव्हल यांनी संबंधित व्हिडिओ फेसबुकवरून शेअर केला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महिला मोटार घेऊन प्रवासाला निघाली होती. 'प्रवासादरम्यान अचानक ग्लोव्ह बॉक्समधून साप बाहेर आला आणि इकडे-तिकडे पाहायला लागला. त्याच्याकडे लक्ष गेल्यानंतर भांबेरी उडाली. पण, धाडस दाखवून मोटार एका मेडिकल स्टोअरसमोर थांबवली. सर्पमित्रांशी संपर्क केल्यानंतर काही वेळातच अँड्र्यु स्मेडली घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अगदी अलगदपणे सापाला हळूहळू बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर समजले की तो विषारी रेड बेली ब्लॅक नावाचा साप होता. सुदैवाने साप आणि मी बचावले आहे, असे महिलेने सांगितले.'

दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये मोटारीमध्ये एका तरुणाला विषारी साप चावल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. मोटारीच्या ब्रेकजवळ साप बसला होता. युवक मोटारीत बसला आणि प्रवासाला निघाला होता. प्रवासादरम्यान ब्रेकवर पाय ठेवला असताना साप चावला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman found venomous snake in cars glove box at australia video viral