मिथेनॉलवर चालणारा ‘रो-बिटल’ तयार

वृत्तसंस्था
Friday, 21 August 2020

रो-बिटलचे स्नायू निकेल-टिटॅनियम संयुगाच्या (निटिनॉल)वायरचे बनलेले असतात.हे स्नायू उष्णता दिल्यास आकुंचन पावतात. वायरला टिटॅनियम पावडरचे आवरण आहे.ही पावडर मिथेनॉलची वाफेसाठी उत्प्रेरक म्हणून काम करते.

न्यूयॉर्क -  सर्वसाधारणपणे रोबो हे बॅटरी किंवा विजेवर चालतात. मात्र, कॅलिफोर्नियातील संशोधकांनी केलेला रो-बिटल इतरांपेक्षा वेगळा असून हा मायक्रोबोट (१ ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे रोबो) वेगळा आहे. हा ‘रो-बिटल’ मिथेनॉलच्या साह्याने कार्य करतो. 

मिथेनॉलसारख्या द्रवरुप इंधनामध्ये बॅटरीपेक्षा अधिक ऊर्जा साठवण्याची क्षमता असते. त्यामुळे मिथेनॉलवर आधारित मायक्रोबोटना अतिरिक्त ऊर्जेचा स्रोत म्हणून बॅटरीची गरज नसते. त्यामुळे त्यांच्या हालचालीही अधिक मुक्तपणे होतात. खऱ्या किड्याच्या वजन आणि आकारातील रोबो तयार करण्याच्या उद्देशाने तयार केला गेला, असे या ‘रो-बिटल’चे संशोधक शिअुफेंग यांग यांनी सांगितले. यासाठी त्यांनी आकुंचन आणि प्रसरण पावणारे अत्यंत सूक्ष्म कृत्रिम स्नायू तयार केले आहेत. सिंथेटिक मसल सिस्टीममुळे हा ‘रो-बिटल’ चालू शकतो, चढू शकतो आणि त्याच्या वजनापेक्षा २.६ पट अधिक वजन दोन तास पेलू शकतो. बॅटरीवर अथवा इलेक्ट्रिकवर चालणारे रोबो उपलब्ध आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्वांत लहान बॅटरीचे वजनही अधिक असते. सध्या हा रो-बिटल दोन तास चालू शकत असला तरी तो अधिक काळ कसा काम करेल, यासाठी संशोधन सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अशी होते हालचाल
रो-बिटलचे स्नायू निकेल-टिटॅनियम संयुगाच्या (निटिनॉल) वायरचे बनलेले असतात. हे स्नायू उष्णता दिल्यास आकुंचन पावतात. वायरला टिटॅनियम पावडरचे आवरण आहे. ही पावडर मिथेनॉलची वाफेसाठी उत्प्रेरक म्हणून काम करते. टिटॅनियम पावडरमुळे बिटलच्या गॅस टाकीतील वाफ गरम होते आणि वायर आकुंचन पावते आणि सूक्ष्मलहरींचा एक झोत हे ज्वलन कमी करतो. त्यामुळे वायर थंड होऊन प्रसरण पावते. ही प्रक्रिया सुरुच राहते आणि ‘रो-बिटल’ची हालचाल होते.     

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘रो-बिटल’ची वैशिष्ट्ये

८८ मिलीग्रॅम वजन 
मिथेनॉल इंधन 
९५ मिलीग्रॅम इंधन क्षमता
०. ६ इंच आकार

संभाव्य उपयोग

  • कृत्रिम परागीभवन 
  • पर्यावरण परीक्षण
  • संशोधन कार्य

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Row-Beetle running on methanol