भारत आपल्यावर हल्ला करणार; पळापळा...

वृत्तसंस्था
Wednesday, 10 June 2020

भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. पाकिस्तान अद्यापही या धक्क्यातून सावरलेला दिसत नाही. विमाने अकाशात घिरट्या घालत असल्याची अफवा पसरली आणि कराची शहराची संपूर्ण वीज घालवण्यात आली. नागरिकांनी रात्रभर जीव मुठीत धरून काढला.

कराची (पाकिस्तान): भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. पाकिस्तान अद्यापही या धक्क्यातून सावरलेला दिसत नाही. विमाने अकाशात घिरट्या घालत असल्याची अफवा पसरली आणि कराची शहराची संपूर्ण वीज घालवण्यात आली. नागरिकांनी रात्रभर जीव मुठीत धरून काढला.

कपाटात मांजर लपली आहे, शोधा बरं...

पाकिस्तानी सोशल मिडीयावर अफवा पसरली की काही अज्ञात लढाऊ विमाने कराचीच्या आकाशात घिरट्या घालत आहेत. भारत आपल्यावर हल्ला करणार; पळापळा... या अफवेनंतर पाकिस्तानी सरकारसह सैन्याची घाबरगुंडी उडाली आणि पाकिस्तानची लढाऊ विमाने हवेत झेपावली. पण, सर्वसामान्य नागरिकांना काही समजत नव्हते. जीव मुठीत धरून बसले होते. प्रशासनाने संपूर्ण शहराची वीज बंद केली. यामुळे तर आणखी घबराट पसली. सोशल मीडियावर भितीपोटी चर्चा सुरू झाली. लढाऊ विमाने घिरट्या घालत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. कराचीमधील नेटिझन्स फोटो, व्हिडिओ ट्विट करू लागले. यामुळे पाकिस्तानी हवाई दलाने कोणतीही खातरजमा न करता स्वत:ची लढाऊ विमाने पाठविली आणि गोंधळात भर पडली.

अखेर, अफवा असल्याचे समजल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचा जीव भांड्यात पडला. पण, पाकिस्तान अद्यापही सर्जिकल स्ट्राईकच्या धक्क्यातून सावरलेला दिसत नाही, हे पुन्हा उघड झाले. दरम्यान, पीओके , गिलगिट, बाल्टिस्तानवरून गेल्या महिनाभरापासून भारत-पाकिस्तानमध्ये तणाव आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेण्याचे ठरविले आहे. यावर भारताने वेळोवेळी पाकिस्तानला हा भाग खाली करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिक कोरोनाच्या दहशती बरोबरच भारताकडून हल्ल्याच्या भितीपोटी जीव मुठीत घेऊन जगत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rumors spread pakistan unknown fighter planes flew air karachi blackout