Rupert Murdoch: मीडिया सम्राट रुपर्ट मर्डोक पुन्हा चढले बोहल्यावर; वयाच्या 93 व्या वर्षी पाचव्यांदा केलं लग्न; कोण आहे पत्नी?

Media Mogul Rupert Murdoch :रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. शनिवारी हे लग्न पार पडले असल्याची माहिती मर्डोक यांच्या प्रवक्त्याने दिली.
Media Mogul Elena Zhukova
Media Mogul Elena Zhukova

नवी दिल्ली- मीडिया सम्राट रुपर्ट मर्डोक हे वयाच्या ९३ व्या वर्षी पाचव्यांदा बोहल्यावर चढले आहेत. त्यांनी ६३ वर्षीय एलेना झुकोवा यांच्याशी लग्न केले आहे. एलेना या निवृत्त मरिन बायोलॉजिस्ट आहेत. रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. शनिवारी हे लग्न पार पडले असल्याची माहिती मर्डोक यांच्या प्रवक्त्याने दिली.

रिपोर्टनुसार, मर्डोक आणि एलेना गेल्या एक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. मर्डोक यांची तिसरी पत्नी वेंडी डेंग यांच्या माध्यमातून एलेना यांची ओळख झाली होती असं डेली मेलने म्हटलं आहे. एलेना यांच्या मुलीचं लग्न देखील काहीच महिन्यांपूर्वी रशियातील एका प्रतिष्ठित राजकीय नेत्यासोबत झाले आहे.

Media Mogul Elena Zhukova
BJP President : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच भाजपचा अध्यक्ष बदलणार; 'या' तीन नावांची आहे चर्चा

रुपर्ट मर्डोक यांचं पहिलं लग्न १९५६ साली झालं होतं. पण, त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते, त्यामुळे ११ वर्षानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक मुल आहे. त्याच वर्षी मर्डोक यांनी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीकडून त्यांना तीन मुलं झाली. तीन दशकांच्या सहजीवनानंतर त्यांनी १९९९ मध्ये घटस्फोट घेतला. त्याच वर्षी त्यांनी डेंग यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. डेंग कडून त्यांना दोन मुलं आहेत.

मर्डोक यांनी चौथ्यांदा अभिनेत्री आणि मॉडेल जेरी हॉल हिच्याशी लग्न केले. त्यांचा सहा वर्षानंतर २०२२ मध्ये घटस्फोट झाला. मागीव वर्षी ते माजी निवृत्त पोलीस अधिकारी अॅन लेसली स्मिथ यांच्याशी लग्न करणार होते, पण काही कारणास्तव शेवटच्या क्षणी त्यांचं लग्न मोडलं. काही विषयांवरील स्मिथ यांच्या मतांमुळे त्यांनी हे लग्न थांबवलं असं सांगितलं जातं.

Media Mogul Elena Zhukova
Rupert Murdoch: सात दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर रुपर्ट मर्डोक 'फॉक्स' च्या अध्यक्षपदावरुन पायउतार

इलेना या रशियामधून अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत. इलेना यापूर्वी अब्जाधीश उर्जा गुंतवणुकदार अलेक्झांडर झुकोव यांच्याशी लग्नबंधनात होत्या. दरम्यान, मर्डोक हे मागील वर्षी न्यूज कॉर्प आणि फॉक्सच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाले होते. तब्बल सात दशकानंतर त्यांनी कारकीर्द थांबवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com