
युक्रेनमध्ये बॉम्बिंग; भारतीय पॅरालिम्पिक मेडलिस्ट चिंतेत
युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद विकोपाला गेलाय. रशियानं आक्रमक भुमिका घेत युक्रेनवर हल्लाही चढवला आहे. दोन्ही देशात युद्ध पेटलं असून युक्रेनमध्ये पडणाऱ्या बॉम्ब हल्ल्यामुळे भारतीय पॅरालिम्पिकपटू आणि रौप्य पदक विजेता हादरला आहे. त्याने टोकिया पॅरालिम्पिक स्पर्धा ज्याच्यामुळे गाजवणं शक्य झाले ते कोच संकटात सापडल्यामुळे भारतीय खेळाडू घाबरला आहे.
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या शरद कुमार (Indian Paralympian Sharad Kumar) याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. शरद कुमार याचा कोच निकितिन येव्हेन (Nikitin Yevhen) युक्रेनमध्ये अडकले आहेत. ते ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्या घरा जवळ बॉम्ब स्फोटाचे आवाज येत आहेत. त्याच्यासह कुटुंबिय देखील अडचणीत सापडले आहेत.
हेही वाचा: Video: रशिया-युक्रेन युद्धाचा शेअर मार्केटवर परिणाम
शरद कुमार याचे कोच Nikitin Yevhen हे युक्रेनमधील खारकिव या शहरातील रहिवाशी आहेत. युक्रेनमधील हे सर्वात मोठ्या शहराच्या यादीतील दुसरे शहर आहे. युक्रेनची राजधानी कीव पासून जवळपास 500 किमी अंतरावर असलेल्या या शहरात बॉम्बिंगचे आवाज येत आहे.
हेही वाचा: मनात आलं ते केलं; पुतिन यांच्या'लाइफस्टाइल'ची झलक!
शरद कुमारनं ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली भावना
शरद कुमार याने ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, नुकतेच माझे कोच Nikitin Yevhen यांच्याशी बोलणं झाले. ते युक्रेनमधील खारकिव शहरात आहेत. ते सध्या अडचणीत आहेत. ते ज्या घरात वास्तव्यास आहेत तिथे बॉम्ब ब्लास्टचे आवाज ऐकू येत आहेत.
शरदने युक्रेनमध्येच घेतलं होत प्रशिक्षण
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धात रौप्य पदक विजेत्या शरद कुमारने या स्पर्धेची तयारी ही युक्रेनमध्येच केली होती. स्पर्धेपूर्वी चार वर्षे तो युक्रेनमधील खारकिवमध्ये Nikitin Yevhen यांच्याकडे मार्गदर्शन घेत होता. शरद कुमारचे प्रशिक्षकांनी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्येही काम केले आहे.
Web Title: Russia Bombs Ukraine Indian Paralympian Sharad Kumar In A Worried About His Coach
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..