रशिया, चीनला जागतिक नेतृत्व करण्याची संधी

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

अमेरिकेने गेल्या पाच दशकांमध्ये जागतिक पटलावर बहुमूल्य योगदान दिले आहे. अन्य कोणत्याही देशाला अमेरिकेसारखी कामगिरी करता येणार नाही.
- जॉन अल्टरमेन, माजी प्रशासकीय अधिकारी, अमेरिका

ट्रम्प यांच्या आत्मकेंद्री "अमेरिका फर्स्ट'च्या धोरणाचा परिणाम

वॉशिंगटन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या "अमेरिका फर्स्ट'च्या धोरणामुळे जागतिक नेतृत्वामध्ये पोकळी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ही पोकळी भरून काढत जागतिक नेतृत्व करण्याची संधी रशिया व चीनसारख्या आर्थिक महासत्तांना मिळण्याची शक्‍यता आहे.

सध्या जागतिक नेतृत्व सांभाळणाऱ्या वॉशिंग्टनची जबाबदारी कोण घेणार, याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. ट्रम्प यांनी त्यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार धोरणे राबविण्यास सुरवात केल्यास जागतिक नेतृत्व इतर देशांकडे जाण्याची शक्‍यता आहे. सध्या चीन आणि रशिया या देशांची आर्थिक स्थिती मजबूत आहे. याचसोबत युरोपीय देशांमधील जर्मनीही जागतिक नेतृत्वाच्या स्पर्धेमध्ये असेल.

अमेरिकेच्या आत्मकेंद्री धोरणाचा फायदा उठवण्यात चीन सर्वाधिक पुढे असणार आहे. मात्र जगातील कोणत्याही देशाकडे अमेरिकेसारखे आर्थिक आणि संरक्षण सामग्रीची तुलना इतर देशांशी करता येणे अशक्‍य आहे. अशा वातावरणात जागतिक नेतृत्वामध्ये पोकळी निर्माण होण्याची शक्‍यता सर्वाधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ट्रम्प यांची धोरणे

  • ट्रान्स- पॅसिफीक भागिदारीतून माघार
  • अमेरिकेमध्ये गुंतवणूक वाढवण्यावर भर
  • अमेरिकन मूलनिवासींना रोजगारांच्या सर्वाधिक संधी

 

Web Title: Russia, China, the opportunity to lead the world