esakal | रशियाचा अमेरिकेच्या निवडणूकीतील हस्तक्षेप धोकादायक- कमला हॅरीस
sakal

बोलून बातमी शोधा

Kamala Harris

हॅरिस यांनी सांगितले की, अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप करू नये. जर या निवडणूकीत रशियाचा हस्तक्षेप झाला तर डेमोक्रॅटिक पक्षाचे (Democratic Party) यामध्ये मोठे नुकसान होऊ शकते.

रशियाचा अमेरिकेच्या निवडणूकीतील हस्तक्षेप धोकादायक- कमला हॅरीस

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॅाशिंग्टन- अमेरिकेतील निवडणूकीत सध्या आरोप- प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी रशियावर (Russia) मोठा आरोप केला आहे. हॅरिस यांनी सांगितले की, अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप करू नये. जर या निवडणूकीत रशियाचा हस्तक्षेप झाला तर डेमोक्रॅटिक पक्षाचे (Democratic Party) यामध्ये मोठे नुकसान होऊ शकते. डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार केले आहे. या निवडणूकीत जो बायडन (Joe Biden) हे डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस सध्या कॅलिफोर्नियामधून सिनेट सदस्य आहेत.

 "2016 च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याचे माझं स्पष्ट मत आहे," असं वक्तव्य कमला हॅरीस यांनी सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत केलं आहे. 'मी सिनेटच्या इंटेलिजेंस अफेयर्स कमिटीवर होते.'  जे घडले त्याचा सविस्तर अहवाल आम्ही प्रकाशित केला होता. यामध्ये रशियाने 2016 च्या अध्यक्षीय निवडणूकीत फेरफार केल्याचे दिसून आले.' अशी माहितीही उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांनी या मुलाखतीत दिली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाबद्दल झालेल्या आरोपांबद्दल एका प्रश्नावर हॅरीस म्हणाल्या, "मला वाटते की 2020 च्या निवडणुकीत परदेशी हस्तक्षेप होईल आणि त्यामध्ये रशिया प्रमुख भूमिका निभावेल." तसेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत याचा डेमोक्रॅटिक पक्षाला फटका बसणार का, या प्रश्नाला उत्तर देताना हॅरीस म्हणाल्या की, निश्चितपणे आम्हाला याचा फटका बसू शकतो. येत्या 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.  जो बिडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार असून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) तर उपाध्यक्ष पदासाठी माइक पेंन्स असतील.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेल्या कमला हॅरिस पहिल्या भारतीय वंशाच्या आणि पहिल्या कृष्णवर्णीय व्यक्ती बनल्या आहेत. अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बिडेन यांच्या डेल्वर येथील विल्मिंग्टन या मूळ गावी झालेल्या सभेत हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाने जाहीर केलेली उमेदवारी अधिकृतरित्या स्वीकारली होती. यावेळी त्या म्हणाल्या त्या म्हनाल्या होत्या की, सरकारमधील अनागोंदीमुळे आपण मागे पडत आहोत. या अकार्यक्षमतेमुळे आपल्या मनात भय निर्माण झाले आहे. आता आपण ही परिस्थिती चांगल्या प्रकारे बदलू शकतो. असा बदल घडवून आणणारा आणि चांगले काम करणारा अध्यक्ष आपण आता निवडायला हवा.'  हा देश कोरोना आणि वंशद्वेष यामुळे दुभंगला आहे. वंशद्वेषावर कोणतीही लस नाही. त्यामुळे आपण सत्तेत आल्यास वंशद्वेष दूर करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. ट्रम्प यांच्या अपयशामुळे अनेकांचा बळी गेला असून ते संकटांचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप