Russia Earthquake : रशियातील कमचटका किनारपट्टीजवळ पुन्हा भूकंप, तीव्रता 7.7 रिश्टर स्केल...त्सुनामीचाही इशारा

Russia Earthquake 7.7 Magnitude Strikes Kamchatka : या भागात भूकंप येण्याची गेल्या दोन महिन्यातली ही दुसरी घटना आहे. यापूर्वी जुलै महिन्यातही इथे भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला होता. त्यावेळी या भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती.
Russia Earthquake 7.7 Magnitude Strikes Kamchatka

Russia Earthquake 7.7 Magnitude Strikes Kamchatka

esakal

Updated on

A massive 7.7 magnitude earthquake hit Russia’s Kamchatka Peninsula : रशियाला भूकंपाचा धक्का बसला आहे. येथील कमचटका प्रायद्वीपाच्या पूर्व किनारपट्टीजवळ या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी मोजण्यात आली असून हा भूकंप समुद्राच्या 10 किलोमीटर खोलीवर झाला असल्याचं जर्मन रिसर्च सेंटर फॉर जियोसाइंसेसकडून सांगण्यात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर ३०० किमीच्या परिघात त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com