

Russia's Novaya Gazeta shuts after 33 years amid state pressure
esakal
Moscow: स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करणाऱ्या माध्यमांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना आता रशियातून आणखी एक वाईट बातमी आली आहे. रशियात सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारितेला मोठा धक्का बसला आहे. भ्रष्टाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि सरकारी गैरव्यवहार उघड करणारे ‘नोवाया गॅझेटा’ हे वृत्तपत्र अखेर बंद झाले आहे.