Russia Crude Oil: 'या' देशाने खोडा घातला म्हणून भारताला रशियन तेलाच्या सवलतीवर सोडावे लागणार पाणी

भारत गेल्या वर्षभरापासून रशियाकडून तेल मोठ्या सवलतीत खरेदी करत आहे पण आता परिस्थिती बदलली आहे.
Russia Crude Oil
Russia Crude OilSakal

Russia Crude Oil: भारत गेल्या वर्षभरापासून रशियाकडून तेल मोठ्या सवलतीत खरेदी करत आहे पण आता परिस्थिती बदलली आहे. 2023 या आर्थिक वर्षात रशियन कच्च्या तेलावरील भारताची मोठी सवलत कमी झाली आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, यामागे दोन कारणे आहेत, पहिले- चीन रशियाकडून अधिक तेल खरेदी करतो आणि दुसरे- तेल उत्पादक देश उत्पादनात कपात करत आहेत.

फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. रशियन तेलावरही किंमतीची मर्यादा घालण्यात आली होती, त्यानंतर रशियाने भारतासह अनेक देशांना स्वस्त दरात कच्चे तेल देऊ केले होते.

भारताने रशियाची ऑफर स्वीकारली आणि रशियन कच्च्या तेलावर प्रति बॅरल 15-20 डॉलरची सूट मिळाली. मात्र आता ही सूट कमी झाली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता ही सवलत 10 डॉलरपर्यंत कमी झाली आहे.

मिंटशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, "रशियन तेलाला आता अधिक खरेदीदार सापडले आहेत आणि कच्च्या तेलावर भारतीय रिफायनर्सना मिळणाऱ्या सवलती कमी झाल्या आहेत."

आतापर्यंत भारतीय रिफायनर्सना प्रति बॅरल 15-20 डॉलरची सरासरी सवलत मिळत होती आणि केवळ रशियन तेल कंपन्या कच्चे तेल वितरीत करण्यासाठी वाहतूक जोखीम घेत असत. पण आता असे दिसत आहे की भारताला रशियन तेलावर प्रति बॅरल 10 डॉलरपेक्षा जास्त सूट मिळणार नाही.

रशिया हा चीनचा प्रमुख कच्च्या तेलाचा पुरवठादार बनला:

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल खरेदीदार चीनने युद्ध सुरू झाल्यापासून रशियन तेलाची प्रचंड खरेदी केली आहे. तो रशियाच्या प्रमुख तेल खरेदीदारांमध्ये सामील झाला आहे.

चीन सरकारच्या आकडेवारीनुसार, जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 मध्ये रशियाने सौदी अरेबियाला मागे टाकून तेल पुरवठादार बनला आहे. चीनने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये 1.94 दशलक्ष बॅरल प्रतिदिन रशियन कच्च्या तेलाची आयात केली.

गेल्या वर्षी याच कालावधीत चीनने रशियाकडून दररोज 1.57 दशलक्ष बॅरल तेल आयात केले होते. म्हणजे आता चीनकडून रशियन तेलाच्या दैनंदिन खरेदीत 23.8% वाढ झाली आहे.

Russia Crude Oil
Ambani vs Adani: 'या' वीज कंपनीसाठी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी समोरासमोर, 14 कंपन्याही शर्यतीत

कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट:

रशियासह ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (OPEC+) प्लसने उत्पादनात दररोज 1.16 दशलक्ष बॅरल अतिरिक्त कपात करण्याची घोषणा केली आहे, जी पुढील महिन्यापासून लागू होईल.

भारताने फेब्रुवारी 2023 च्या मध्यापर्यंत रशियाकडून सुमारे 30 अब्ज डॉलर किंमतीचे कच्चे अनुदानित तेल खरेदी केले आहे.

अनुदानित रशियन तेलाने भारताची पेट्रोलियम उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत केली. FY23 मध्ये, 22.23 दशलक्ष टन पेट्रोलियम उत्पादनांचा वापर झाला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 10.2% अधिक आहे.

रशियन तेलावरील प्रचंड सवलतीचा भारतीय रिफायनर्सना मोठा फायदा:

रशियन तेलावरील मोठ्या सवलतींमुळे सरकारी रिफायनर्सना त्यांचे ग्रॉस रिफायनिंग मार्जिन (GRM) सुधारण्यास मदत झाली आहे.

गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत, रशियाकडून खरेदी केलेल्या अनुदानित तेलाने सरकारी मालकीच्या रिफायनर्सना त्यांचे शुद्धीकरण मार्जिन दुप्पट करण्यास मदत केली.

भारतात सध्या 23 तेल शुद्धीकरण कंपन्या आहेत ज्या दरवर्षी 24.936 दशलक्ष टनांपेक्षा जास्त तेल शुद्ध करतात. भारत 2025 पर्यंत त्याची शुद्धीकरण क्षमता वार्षिक 400 मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यावर काम करत आहे.

मोठ्या भारतीय रिफायनर्समध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, नायरा एनर्जी लिमिटेड यांचा समावेश आहे.

Russia Crude Oil
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com