रशियाचे पंतप्रधान मेदवेदेव यांचा राजीनामा

पीटीआय
Thursday, 16 January 2020

रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे सादर केल्याची माहिती "टास' या स्थानिक वृत्तसंस्थेने दिली. 

याविषयी रशियन वृत्तसंस्थेनी सांगितले की, मेदवेदेव यांनी राजीनामा दिल्यानंतर पुतीन यांनी त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानत त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळासाठी ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात ते अपयशी ठरल्याचेही पुतीन या वेळी म्हणाले.

मॉस्को - रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे सादर केल्याची माहिती "टास' या स्थानिक वृत्तसंस्थेने दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याविषयी रशियन वृत्तसंस्थेनी सांगितले की, मेदवेदेव यांनी राजीनामा दिल्यानंतर पुतीन यांनी त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानत त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळासाठी ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात ते अपयशी ठरल्याचेही पुतीन या वेळी म्हणाले. तसेच, पुतीन हे मेदवेदेव यांना अध्यक्षीय सुरक्षा मंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्याची योजना असल्याचे मत स्थानिक माध्यमांनी व्यक्त केले आहे. मेदवेदेव हे 2012 पासून रशियाचे पंतप्रधान होते; तर त्यापूर्वी 2008 ते 2012 या चार वर्षांमध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: russia Prime Minister medvedev resigns