David Warner Clean Bowled | Video: बोल्टची 'स्मार्ट' गोलंदाजी... वॉर्नरचा उडवला त्रिफळा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

David-Warner-Trent-Boult

ट्रेंट बोल्टने डेव्हिड वॉर्नरला गुडघ्यावर बसायला भाग पाडलं...

Video: बोल्टची 'स्मार्ट' गोलंदाजी... वॉर्नरचा उडवला त्रिफळा!

NZ vs AUS, T20 World Cup Final: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने २० षटकात ४ बाद १७२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच स्वस्तात बाद झाला. पण डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या जोडीने ९२ धावांची भागीदारी करत संघाला दमदार खेळी उभारून दिली. डेव्हिड वॉर्नरने दिमाखदार अर्धशतक झळकावले पण ट्रेंट बोल्टने स्मार्ट गोलंदाजी करत त्याचा त्रिफळा उडवला.

हेही वाचा: Video: विल्यमसनचा 'बाएं हाथ का खेल'... लगावला एकहाती षटकार!

वॉर्नर तुफान फॉर्मात खेळत होता. तो ३७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावांवर होता. ड्रिंक्स ब्रेक नंतर ट्रेंट बोल्ट गोलंदाजीस आला आणि त्याने स्मार्ट गोलंदाजी केली. आखूड टप्प्याचा चेंडू टाकत त्याने चेंडूचा वेग कमी ठेवला, त्यामुळे चेंडूने फारशी उसळी घेतली नाही. यातच वॉर्नर फसला अन् क्लीन बोल्ड झाला.

हेही वाचा: Video : विल्यमसनचा एक कॅच सोडणं ऑस्ट्रेलियाला पडलं भारी

असा उडाला वॉर्नरचा त्रिफळा-

हेही वाचा: T20 WC Final आयुष्यात पहिल्यांदाच स्टार्कची वाईट धुलाई

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या १० षटकात तो निर्णय गोलंदाजांनी सार्थदेखील ठरवला, पण शेवटच्या १० षटकात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने डावाला तुफान गती दिली. त्याच्या ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर १७२ धावांपर्यंत मजल मारली.

loading image
go to top