भारतीय लष्कराची ताकद वाढणार! रशियाकडून S-400 सिस्टीमची डिलिव्हरी सुरू | S-400 Defense System | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

S-400 air missile systems

भारताला रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टिमची डिलिव्हरी सुरू

नवी दिल्ली : रशियाने भारताला S-400 एअर डिफेन्स सिस्टिम (S-400 air missile systems) वितरण सुरू केले आहे. दुबई एअरशोमध्ये फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी टेक्निकल कोऑपरेशन (FSMTC) चे संचालक दिमित्री शुगाएव (Dmitry Shugaev) यांनी ही माहिती दिली आहे. शुगाएव यांनी यावेळी सांगीतले की "भारताला S-400 हवाई संरक्षण प्रणालीचा पुरवठा सुरू झाला आहे आणि वेळेवर वितरित केला जात आहे." FSMTC ही रशियन सरकारची मुख्य संरक्षण निर्यात नियंत्रण संस्था आहे. रशिया आणि भारताने ऑक्टोबर 2018 मध्ये पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली S-400 च्या पुरवठ्यासाठी करार केला होता. भारतापूर्वी ही संरक्षण यंत्रणा तुर्की आणि चीनच्या सैन्यात सामील झाली आहे.

भारताची मारक क्षमता वाढणार

भारतीय संरक्षण उद्योगातील सूत्रांनी सांगितले की, S-400 हवाई संरक्षण प्रणाली भारतात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे आणि ते प्रथम पश्चिम सीमेच्या जवळ तैनात केले जातील ज्या ठिकाणांहून पाकिस्तान लगतची सीमा आणि पश्चिमी आणि उत्तरेकडून येणाऱ्या संकटांचा सामना करता येईल. दरम्यान भारताने ऑक्टोबर 2019 मध्ये रशियाकडून सुमारे 35,000 कोटी रुपयांना पाच S-400 खरेदी करण्याचा करार केला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही उपकरणे सागरी आणि हवाई मार्गाने भारतात आणली जात आहेत. पहिल्या स्क्वॉड्रनच्या तैनातीनंतर, देशामध्ये जवानांच्या प्रशिक्षणासाठी संसाधने उपलब्ध करून देण्याबरोबरच पूर्व सीमांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली जाईल. जमिनीवरून हवेत मारा करणारी ही यंत्रणा मिळाल्याने भारताची मारक क्षमता आणखी मजबूत होणार आहे.

हेही वाचा: टॉप 5 स्मार्टफोन्स जे एका चार्जमध्ये देतात बेस्ट बॅटरी लाईफ

काय आहेत S-400 ची वैशिष्ट्ये

S-400 ही रशियाने निर्यातीसाठी तयार केलेली सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे 400 किमीपर्यंतच्या परिघात शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे आणि अगदी ड्रोनही नष्ट केले जाऊ शकतात. त्याची ट्रॅकिंग क्षमता सुमारे 600 किमी आहे. सुमारे 400 किमीच्या परिघात शत्रूची लपवलेली शस्त्रे हवेत नष्ट करण्यासाठी ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. ते बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि हायपरसॉनिक लक्ष्यांवर मारा करण्यासही सक्षम आहेत.

S-400 चा फायरिंग रेट त्याच्या आधिची आवृत्ती S-300 पेक्षा 2.5 पट जास्त आहे. प्रत्येक S-400 बॅटरीमध्ये लांब पल्ल्याचे रडार, कमांड पोस्ट वाहन, टार्गेट एक्झिकूशन रडार आणि दोन बटालियन लाँचर असतात. प्रत्येक लाँचरमध्ये चार ट्यूब असतात. S-400 मध्ये 400 किमी, 250 किमी, 120 किमी आणि 40 किमीच्या पल्ल्याची चार वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत. लांब पल्ल्याच्या रडारवर एकाच वेळी 100 हून अधिक उडणाऱ्या वस्तूंचा मागोवा घेता येतो आणि डझनहून अधिक लक्ष्ये नष्ट करण्याची क्षमता असते.

हेही वाचा: मंडेलांची सुटका करणारा आणि दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा वसाहतवादी नेता

loading image
go to top