टॉप 5 स्मार्टफोन्स जे एका चार्जमध्ये देतात बेस्ट बॅटरी लाईफ; पाहा यादी | Best battery phone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Moto_G9_Power

टॉप 5 स्मार्टफोन्स जे एका चार्जमध्ये देतात बेस्ट बॅटरी लाईफ

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

बाजारात दररोजच नवे स्मार्टफोन लॉन्च होत आहेत ज्यामध्ये सर्वाधिक पावरफुल बॅटरी देण्याचा प्रयत्न कंपन्या करत आहेत. यापैकी बऱ्याच स्मार्टफोन्सना एका चार्जमध्ये भरपूर तास चालणारी बॅटरी मिळते देखील. काही स्मार्टफोन्समध्ये तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने, कमी mAh बॅटरीमध्येही जास्त बॅटरी लाइफ फर केली जाते. TechAdvisor च्या अहवालानुसार, 2021 च्या बॅटरी फोनची दोन आधारांवर टेस्ट करण्यात आली आहे. यामधून, बॅटरी क्षमता आणि स्मार्टफोन बॅटरी चालण्याच्या वेळेच्या आधारावर टॉप-5 सर्वोत्तम बॅटरी फोन निवडले गेले आहेत, पाहा यादी..

Nokia XR20

बॅटरी क्षमता - 4470mAh

किंमत (6GB RAM + 128GB) - 46,999 रुपये

Nokia XR20 स्मार्टफोनमध्ये ड्युअल-सिम स्लॉट दिला असून हा डिव्हाइस Android 11 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.67-इंचाचा डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1,080x2,400 पिक्सेल, आस्पेक्ट रेशो 20: 9 तसेच पीक ब्राइटनेस 550 nits आहे. या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट आणि 6GB रॅम स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असेल. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून त्याचा प्रायमरी सेन्सर 48MP आहे, तर त्यात 13MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. याशिवाय स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल. Nokia XR20 स्मार्टफोनमध्ये 18 वॉट वायर आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,630mAh बॅटरी मिळते.

Vivo Y20s

बॅटरी क्षमता - 5000mAh

किंमत (6GB RAM + 128GB स्टोरेज) - 15,400 रुपये

Vivo Y20s G स्मार्टफोन ड्युअल-सिम स्लॉट असलेला हा फोन Android 11 आधारित Funtouch OS 11 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात पहिला 13MP प्रायमरी सेन्सर, दुसरा 2MP पोर्ट्रेट लेन्स आणि तिसरा 2MP मॅक्रो लेन्स आहे. तसेच, एक 8MP सेल्फी कॅमेरा देखील असेल. Vivo Y20s G स्मार्टफोन 720x1,600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.51-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले सह येतो या स्मार्टफोनमध्ये चांगल्या कामगिरीसाठी MediaTek Helio G80 प्रोसेसर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. Vivo Y20s G मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

हेही वाचा: स्वस्तात मस्त असलेले Redmi चे टॉप 5 स्मार्टफोन्स, पाहा यादी

Moto G9 Power

बॅटरी क्षमता - 6000mAh

किंमत (4GB RAM आणि 64GB) - 11,999 रुपये

Moto G9 Power Android 10 OS वर काम करतो आणि यामध्ये तुम्हाला 6.8-इंचाचा HD + IPS डिस्प्ले दिला आहे. त्याचे स्क्रीन रिझोल्यूशन 720x1,640 पिक्सेल असून हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरवर काम करतो. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी सेन्सर 64MP आहे. यात 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देखील आहे. दुसरीकडे, सेल्फी शौकिनांना या बजेट रेंज स्मार्टफोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Realme 8 Pro

बॅटरी क्षमता - 4500mAh

किंमत (8GB RAM 128GB स्टोरेज) - 13,999 रुपये

Realme 8 Pro स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा सुपर AMOLED OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याची स्क्रीन ब्राइटनेस 1000nits असून टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. Qualcomm Snapdragon 720G फोनमध्ये प्रोसेसर असलेला Realme 8 Pro स्मार्टफोन Android 11 आधारित realme UI 2.0 वर काम करेल. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून त्याचा प्रायमरी कॅमेरा 108MP Samsung ISOCELL HM2 आहे. याशिवाय, 8MP 119 डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP B&W पोर्ट्रेट लेन्स देखील देण्यात आल्या आहेत. पॉवर बॅकअपसाठी, Realme 8 Pro मध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्याला 50W SuperDart फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा: या दिवाळीत खरेदी करा इलेक्ट्रिक स्कूटर, हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

Xiaomi Mi 10T Pro

बॅटरी क्षमता -5000mAh

किंमत (8GB RAM + 128GB स्टोरेज) - 39,999 रुपये

या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा डिस्प्ले, 650 nits ब्राइटनेस लेव्हल, सनलाइट मोड 2.0, 360-डिग्री लाइट मोड, 4097 ब्राइटनेस लेव्हल अशी फीचर्स देण्यात आली आहेत. स्क्रीन रिझोल्यूशन 1,080x2,400 पिक्सेल आहे आणि ते 144Hz रिफ्रेश रेटसह येते. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108MP आहे. याशिवाय 13MP वाइड अँगल लेन्स, 5MP मायक्रो लेन्सला सपोर्ट देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर सेल्फीसाठी 20MP कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरवर काम करतो. तर पॉवर बॅकअपसाठी यात 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

loading image
go to top