रशियाला दणका : मानवाधिकार परिषदेतून केले निलंबित; बुचामधील हत्याकांडानंतर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia suspended from Human Rights Council

रशियाला दणका : मानवाधिकार परिषदेतून केले निलंबित; भारतानं मतदान टाळलं

संयुक्त राष्ट्र महासभेने रशियाला मानवाधिकार परिषदेतून निलंबित केले आहे. युक्रेनमधील (ukraine) बुचा शहरात केलेल्या हत्याकांडानंतर हे पाऊल उचलल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेने दिली आहे.

जागतिक संघटनेच्या प्रमुख मानवाधिकार संघटनेने रशियाला निलंबित करण्याचा ठराव महासभेने मंजूर केला आहे. ठरावाच्या मसुद्याच्या बाजूने ९३ देशांनी मतदान केले तर २४ देशांनी विरोधात मतदान केले. तर ५८ देश गैरहजर राहिले. भारत या सभेत हजर होता, पण भारतानं मतदान करण्याचे टाळले. (Russia suspended from Human Rights Council)

बुखारुशियन सैन्याने माघार घेतल्यानंतर युक्रेनियन शहरात डझनभर लोक मृतावस्थेत आढळले होते. यानंतर जगभरातून टीका झाली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नागरिकांच्या मृत्यूमध्ये कोणताही सहभाग नाकारला आहे. त्यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांवर हे वृत्त खोटे असल्याचा आरोप केला आहे. रशियाने बुका येथे केलेल्या हत्याकांडाचा अमेरिका, ब्रिटनसह अनेक युरोपीय देशांनी तीव्र निषेध केला आहे.

रशियाच्या (russia) मानवाधिकार परिषदेतील सहभागाला अमेरिकेने नाटक म्हटले आहे. कॅनडा, कोलंबिया, अँटिग्वा आणि बारबुडा, कोस्टा रिका, रिपब्लिक ऑफ मोल्दोव्हा, जॉर्जिया, जपान, लायबेरिया, ब्रिटन, युक्रेन, अमेरिका आणि युरोपियन युनियनसह २७ सदस्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेचे विशेष आपत्कालीन सत्र बोलावले. बुचाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रशियावर आणखी कठोर निर्बंध घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा: केजरीवाल म्हणाले, भाजपला पराभूत करणे हे माझे ध्येय नाही, तर...

निर्णय लोकशाही चौकटीत घेतले पाहिजेत

मानवाधिकारांचे संरक्षण करण्यात भारत आघाडीवर आहे. आमचा विश्वास आहे की सर्व निर्णय योग्य प्रक्रियेचा आदर करून आणि लोकशाही चौकटीत घेतले पाहिजेत. हे आंतरराष्ट्रीय संस्थांना विशेषतः संयुक्त राष्ट्रांना लागू होते, संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी चर्चेदरम्यान सांगितले.

युद्ध गुन्हेगारांना स्थान नाही

युक्रेनचे (ukraine) परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी गुरुवारी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून रशियाला (russia) निलंबित करण्याच्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या निर्णयाचे स्वागत केले. ठरावाला पाठिंबा देणाऱ्या आणि इतिहासाची उजवी बाजू निवडणाऱ्या सर्व सदस्य राष्ट्रांचे आम्ही आभारी आहोत, असे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्र संघात युद्ध गुन्हेगारांना स्थान नाही.

Web Title: Russia Suspended From Human Rights Council Action After The Murder In Bucha United Nations General Assembly Ukraine Russia War

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..