रशिया-युक्रेनमध्ये होणार शांतता करार ? शुक्रवारी महत्त्वाची बैठक

युक्रेन-रशिया युद्ध समाप्तीसाठी एक पाऊल पुढे !
Putin and zelensky
Putin and zelensky Team eSakal

इस्तंबूल : युक्रेन आणि रशिया दरम्यान संभाव्य शांतता करारासाठी व्हिडिओ काॅन्फ्रन्सच्या माध्यमातून उद्या शुक्रवारी (ता.एक) पुन्हा चर्चा होणार आहे. युक्रेनच्या (Ukraine) प्रतिनिधीमंडळाच्या प्रमुखांनी ही माहिती दिली. युक्रेनियन प्रतिनिधीमंडळाचे सदस्य तथा संसदेतील सत्तारुढ पक्षाचे नेतृत्व करणारे डेव्हिड अरखामिया यांनी सांगितले, की प्रतिनिधीमंडळांनी दोन आठवड्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केल्यानंतर मंगळवारी (ता.२९) इस्तांबुलमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. आतापर्यंत झालेल्या चर्चेमध्ये एक संभाव्य शांतता कराराची थोडीशी आशेची किरण दिसत आहे. यात युक्रेनियन प्रतिनिधीमंडळाने नाटोत सामील न होण्याचा निर्णय घेतला. ही मागणी रशियाकडून (Russia) केली जात होती. तसेच अनेक मागण्यांवर सहमती दर्शवली आहे. युक्रेनच्या प्रस्तावावर रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. (Russia Ukraine Crisis Agreement To Be Between Two Countries)

Putin and zelensky
अवघ्या १८ महिन्यांच्या बाळाला दुर्मिळ आजार, १६ कोटींच्या इंजेक्शनानं मिळालं 'जीवदान'

रशिया-युक्रेन युद्ध सुरु होताच युरोपमध्ये सायबर हल्ला

युरोपमध्ये हजारो मोडियमला प्रभावित करणारे आणि युक्रेनचे सैन्य तथा सरकारकडून वापर केले जाणारे उपग्रह नेटवर्कवर सायबर हल्ल्यांसाठी साॅफ्टवेअर कमांडचा वापर रशियाचे आक्रमण केले गेले होते. उपग्रहाचे स्वामीत्व असणाऱ्या कंपनीने बुधवारी हा खुलासा केला. मोडियम हा एक हार्डवेअर उपकरण आहे. त्याचा वापर संगणकाला केबल किंवा टेलिफोनच्या माध्यमातून डेटा पाठवले जाते. अमेरिकेतील वायासेटचे मालकाने सायबर हल्ल्यांसंबंधी पहिल्यांदा माहिती देताना म्हटले होते, की रशिया आणि युक्रेन युद्धाच्या सर्वात गंभीर ज्ञात सायबर हल्ल्याविषयी माहिती कशी समजली. या हल्ल्याने पोलंडपासून फ्रान्सपर्यंतच्या युझर्जला प्रभावित केले. मध्य युरोपात हजारो विण्ड टर्बाईनपर्यंत पोहोचल्याने हल्ल्याची माहिती मिळाली.

Putin and zelensky
श्रीलंकेची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत, प्रत्येक दिवशी १० तास वीज गायब

'द असोसिएटेड प्रेस' ने विचारले असता वायासेटने हल्ल्यासाठी कोण जबाबदार आहे हे सांगितले नव्हते. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी मात्र यासाठी रशियन हॅकर्सला जबाबदार धरले आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरु करताच वायसॅटवर हल्ला केला गेला होता. हा सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचे अनेकांनी सांगितले. अशा प्रकारचे हल्ले आतापर्यंत समोर आले नव्हते. सायबर हल्ल्यामुळे युरोपीय देशांमध्ये हजारो लोकांना ब्राॅडबँड इंटरनेट कनेक्शन खंडित झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com