श्रीलंकेची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत, प्रत्येक दिवशी १० तास वीज गायब | Sri Lanka In Financial Crisis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lank Face  electricity Shortage

श्रीलंकेची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत, प्रत्येक दिवशी १० तास वीज गायब

कोलंबो : श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. श्रीलंकेने बुधवारपासून (ता.३०) देशात प्रत्येक दिवशी १० तास वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. या मागील कारण इंधन टंचाई असल्याचे सांगितले जात आहे. सरकारी वीज प्राधिकरणाने म्हटले आहे, की मार्चच्या सुरुवातीपासून आतापर्यंत प्रत्येक दिवशी ७ तास वीजपुरवठा खंडित केला जात होता. मात्र औष्णिक वीज निर्मितीसाठी इंधनाची कमतरता असल्याने ती १० तासांपर्यत वाढवली गेली आहे.

पगार करण्यासाठी श्रीलंकेकडे पैसे नाही

अधिकाऱ्यांनी सांगितले, की श्रीलंकेच्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक विजेची निर्मिती पाण्यापासून केली जाते. मात्र बहुतेक जलाशयातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती. कारण पाऊसच झालेला नाही. श्रीलंकेत (Sri Lanka) अधिकचे वीज उत्पादन कोळसा आणि तेलापासून केले जाते. दोन्ही आयात केले जाते. मात्र पुरवठा कमी आहे. कारण आयात करण्यासाठी पुरेशी परकीय गंगाजळी नाही. (Sri Lanka Cuts Electricity For 10 Hours In Country)

हेही वाचा: Sharad Pawar | शरद पवार यांच्याकडे युपीएचे नेतृत्व ? बैठकीत ठराव मंजूर

तीन महिन्यांमध्ये दुप्पट झाल्या पेट्रोलच्या किंमती

श्रीलंकन सरकारी कंपनी सिलोन पेट्रोलियम काॅर्पोरेशनने (CPC) म्हटले आहे, की कमीत-कमी दोन दिवसांपर्यंत डिझेल पुरेल. वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोलची किंमत ९२ टक्के आणि डिझेलची ७६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

हेही वाचा: जीवाची परवा न करता बहिणीला वाचवले, पण... कमावत्या भावाचा गेला जीव

भारताकडून श्रीलंकेला हवयं कर्ज

श्रीलंकेने मार्च २०२० मध्ये आपल्या ५१ बिलियन डाॅलरचे विदेशी कर्ज फेडण्यासाठी आवश्यक विदेशी मुद्रा वाचवण्यासाठी व्यापक आयात प्रतिबंध लावले. मात्र यामुळे अत्यावश्यक वस्तुंची टंचाई निर्माण झाली असून किंमतींमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढले आहेत. अनेक दवाखान्यांनी नियमित शस्त्रक्रिया बंद केल्या आहेत. सरकारने म्हटले आहे, की भारत (India) आणि चीनकडून (China) आणखीन कर्ज मिळतेय का याची चाचपणी केली जात आहे.

Web Title: Sri Lanka Cuts Electricity For 10 Hours In Country

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..