Russia-Ukraine : टोकमकमध्ये दोन्ही देशांचे सैनिक भिडले; अनेकांचा मृत्यू
Serhii Nuzhnenko

Russia-Ukraine : टोकमकमध्ये दोन्ही देशांचे सैनिक भिडले; अनेकांचा मृत्यू

युक्रेन-रशियामध्ये गेल्या सहा दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. या दोन्ही देशांमध्ये काल शांतता चर्चा पार पडली. पण, युद्धावर पूर्णविराम लागत नसल्याने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चिता व्यक्त केली. यावेळी त्यांनी रशियाला खडसावत युक्रेनच्या पाठिशी असल्याचं सांगितलंय. आज दिवसभरात काय काय घडतंय याचे लाईव्ह अपडेट्स फक्त 'सकाळ'वर... 

युक्रेनमधील टोकमकमध्ये दोन्ही देशांमधील सैनिक एकमेकांना भिडले आहेत. यात अनेक सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसंच काही जखमीसुद्धा झाले आहेत.

Russia-Ukraine : टोकमकमध्ये दोन्ही देशांचे सैनिक भिडले; अनेकांचा मृत्यू
UNGA मध्ये रशियाविरोधात प्रस्ताव मंजूर; भारताची तटस्थ भूमिका

रशियन हल्ल्यांनी बेचिराख झालेल्या खारकिव्हमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. महापौरांनी गुरुवार सकाळपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे.

युक्रेन रशिया यांच्यातील संघर्षाने आता युद्धाचं रूप घेतलं आहे. युक्रेनमध्ये हजारो भारतीय अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. गेल्या तीन दिवसात मोदींची ही पाचवी बैठक आहे.

Russia-Ukraine : टोकमकमध्ये दोन्ही देशांचे सैनिक भिडले; अनेकांचा मृत्यू
PM मोदी आज रात्री पुतीन यांच्याशी दुसऱ्यांदा करतील चर्चा!

रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनच्या २ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक व्यवस्था, रुग्णालये, घरे इत्यादी उद्ध्वस्त करण्यात आली असल्याचा दावा युक्रेनच्या आपत्कालीन विभागाने बुधवारी केला आहे.

खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी आणखी एक अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी तात्काळ खारकिव्ह सोडा असं आवाहन यामध्ये करण्यात आलं आहे.

रशियाकडून हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून खार्किव्हमध्ये सिटी काउन्सिलच्या इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. खार्किव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी नुकतीच अॅडव्हायजरी जारी करण्यात आली होती.

Russia-Ukraine : टोकमकमध्ये दोन्ही देशांचे सैनिक भिडले; अनेकांचा मृत्यू
Ukraine: रशियातील सर्वसामान्यांना युद्धाचा दणका; जनतेचे प्रचंड हाल

युरोपीय संघाने सात रशियन बँकांना जागतिक स्विफ्ट नेटवर्कमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. युक्रेनवर रशियाने लादलेल्या युद्धावर बंदी घातली होती. याचं उल्लंघन झाल्यानं युरोपियन संघाने हे पाऊल उचललं आहे. स्विफ्ट नेटवर्कमधून काढून टाकलेल्या बँकांमध्ये रशियातील व्हीटीबी बँकेचा समावेश आहे.

रशियन सैन्याने दक्षिण युक्रेनमधील शहर खेरसॉनवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. तर खेरसॉनचे महापौर इगोर कोलिखैव यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, आम्ही अजुनही युक्रेनचे नागरिक आहे आणि अजूनही आम्ही ठाम आहोत. दुसऱ्या बाजुला खार्किव्हमध्ये झालेल्या हल्ल्यात १३६ नागरिकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे.

आजारी विद्यार्थ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

युक्रेनवर रशियाकडून हल्ले सुरू आहेत. आता आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विन्नित्सिया शहरातील मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा चंदन जिंदल हा विद्यार्थी आजारी पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेंदूत इस्केमिया स्ट्रोकच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात आणलं होतं. मात्र उपचारावेळीच त्याचा मृत्यू झाला.

रशियन सैनिकांनी दावा केला आहे की, त्यांनी खेरसॉन शहरावर ताबा मिळवलाय. अद्याप यावर युक्रेनने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर कोनोटॉपच्या महापौरांनी असा दावा केला की, रशियन सैनिकांनी त्यांना धमकी दिली की शहर आमच्या ताब्यात द्या नाहीतर सगळं उद्ध्वस्त करून टाकेन.

Russia-Ukraine : टोकमकमध्ये दोन्ही देशांचे सैनिक भिडले; अनेकांचा मृत्यू
संचारबंदी शिथिल होताच, युक्रेनच्या सीमा ओलांडा आणि बाहेर पडा; भारत सरकारच्या सूचना
  • रशिया (Russia) युक्रेनच्या पूर्व भागातील संघर्षमय परिस्थितीमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी "ह्युमॅनिटॅरियन कॉरिडॉर" (humanitarian corridors) तयार करण्याचं काम करत आहे. तसेच खार्किव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी दिलं आहे.

  • रशियाने युक्रेनमधील खार्किवच्या निवासी भागात हल्ले केल्यानंतरची विदारक दृश्ये...

  • युक्रेन आणि रशियाच्या युद्धादरम्यान, गेल्या सहा दिवसात 6 हजार रशियन मारले गेल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले आहे.

  • पूर्व युक्रेनमधील खार्किवमध्ये रशियाच्या हवाई हल्ल्यामध्ये पोलिस विभागाची इमारत नेस्तनाबूत झाली आहे.

  • युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी मोल्दोव्हामार्गे भारतात रवाना झाले.

  • युक्रेनमधील पूर्वेकडील खार्किव शहरात गेल्या 24 तासांत झालेल्या गोळीबारात 21 जण ठार आणि 112 जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती प्रादेशिक गव्हर्नर ओलेग सिनेगुबोव्ह यांनी बुधवारी दिली आहे.

  • खार्किव, युक्रेनमध्ये शक्तिशाली स्फोटांचे आवाज; कीव्ह इंडेपेंडन्सची माहिती

  • युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय अडकले होते. त्यापैकी 24 फेब्रुवारीपर्यंत 4000 लोक परतले. कालपर्यंत 2000 हून अधिक लोक परतले आहेत. आम्ही उर्वरित भारतीयांना रोमानिया, पोलंड हंगेरी, स्लोव्हाकिया आणि मोल्दोव्हा मार्गे परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. : भारताचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरण

  • युनायटेड एअरलाइन्सने रशियन एअरस्पेसचा वापर बंद केला आहे तसेच दोन भारतीय मार्गही निलंबित केले आहेत, अशी बातमी असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेने दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियन विमानांना अमेरिकन हवाई क्षेत्रात बंदी घातल्याच्या घोषणेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची दोन विमाने हिंडन एअरबेसवरून रोमानिया आणि हंगेरीसाठी उड्डाण केलं आहे.

  • केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी युक्रेनमधून परतलेल्या भारतीयांचं त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये बोलून स्वागत केलंय.

  • युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची आणखी तीन विमाने आज पोलंड, हंगेरी आणि रोमानियाला जाणार आहेत. C-17 ग्लोबमास्टर या विमानाने आज पहाटे 4 वाजता ऑपरेशन गंगा अंतर्गत रोमानियासाठी उड्डाण केलं आहे.: IAF अधिकारी

बायडन यांनी युक्रेनच्या लढ्याचं कौतुक केलं आहे. आर्थिक निर्बंध लादून रशियाची मोठी कोंडी करणार असल्याची घोषणा केली आहे. रशियन विमानांसाठी अमेरिकेची हवाई हद्द बंद करणार असल्याचंही सांगितलं.

  • युक्रेनच्या जमिनीवर अमेरिकेचं सैन्य उतरवणार नाही, नाटो संरक्षणासाठी कटीबद्ध असल्याचा निर्वाळा दिला.

  • अमेरिका युक्रेनला एक बिलीयन डॉलरचं अर्थसहाय्य करणार असून आम्ही युक्रेनसोबत आहोत. We Stand With You! अशी ठाम घोषणा केली आहे.

  • रशियाच्या सध्याच्या आर्थिक दुरावस्थेला फक्त व्लादिमीर पुतिनच जबाबदार असल्याचं छातीठोकपणे सांगितलं.

  • जेव्हा या कालखंडाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा पुतिनच्या युक्रेनवरील युद्धामुळे रशिया कमकुवत झाल्याचं लिहलं जाईल आणि उर्वरित जग अधिक मजबूत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com