सर्वांत मोठा युद्धगुन्हा मारिउपोलमध्ये

रशियन सैनिकांनी नऊ हजार नागरिकांना मारून पुरल्याचा युक्रेनचा दावा
russia ukraine crisis Ukraine claims Russian troops killed 9000 civilians War crimes in Mariupol
russia ukraine crisis Ukraine claims Russian troops killed 9000 civilians War crimes in Mariupolsakal

किव्ह : ‘एकविसाव्या शतकातील सर्वांत मोठा युद्धगुन्हा मारिउपोलमध्ये घडला आहे. पुतीन यांनी येथे हजारो नागरिकांची हत्या केली आहे,’ असा आरोप मारिउपोलचे महापौर वेदीम बॉयचेन्को यांनी आज केला. मारिउपोल बाहेरील मान्हुश गावात किमान नऊ हजार नागरिकांना मारून पुरले असल्याचा दावाही त्यांनी ‘टेलिग्राम’वरील पोस्टद्वारे केला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या आदेशावरून झालेल्या ज्यू नागरिकांच्या हत्याकांडात ३४ हजार युक्रेनी ज्यू मारले गेले होते. त्याचा संदर्भ देत बॉयचेन्को म्हणाले की,‘मारिउपोलमध्ये या शतकातील सर्वांत मोठा युद्धगुन्हा घडला आहे.

हिटलरने ज्यू, रोमा आणि स्लाव्ह नागरिकांची हत्या केली होती. आता पुतीन युक्रेनी लोकांना नामशेष करत आहेत. त्यांनी मारिउपोलमध्ये आतापर्यंत हजारो नागरिकांची हत्या केली आहे. जगाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येणे अपेक्षित आहे. हा वंशच्छेद काहीही करून थांबववायलाच हवा.’ मान्हुश गावाजवळ रशियन सैनिकांनी लांबच लांब खड्डे खणले असून त्यात मारलेल्या नागरिकांना पुरुन टाकले जात आहे, अशा प्रकारे नऊ हजार नागरिकांना मारले असल्याचा आरोप बॉयचेन्को यांनी केला आहे.

युद्धाच्या आघाडीवर

  • रशियाच्या जोरदार माऱ्यामुळे मारिउपोलमधून एकाही नागरिकाला बाहेर पडणे अशक्य

  • क्रिमिया व रशियाच्या सीमेवरील पुलावर युक्रेनकडून हल्ले शक्य

  • चार बेटांवर रशियाचा बेकायदा ताबा : जपान

  • पुढील आठवड्यात युक्रेनमधील दूतावास सुरु करणार : ब्रिटन

हॅरिस, झुकेरबर्गवर बंदी

मॉस्को : अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि ‘मेटा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांच्यासह २७ अमेरिकी नागरिकांना रशियात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. कॅनडाच्याही ६१ नागरिकांवर रशियाने असेच निर्बंध जारी केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com