युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली जखमी जवानांची भेट,म्हणाले - लवकर व्हा बरे ! | Ukraine And Volodymyr Zelensky | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ukrainian President Volodymyr Zelensky Meet Injured Soldiers

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली जखमी जवानांची भेट,म्हणाले - लवकर व्हा बरे !

किव्ह : युक्रेनवरील हल्ले रशियाकडून सुरुच आहेत. यामुळे येथील स्थिती भयावह बनली आहे. अशा स्थितीत ही युक्रेनचे (Ukraine) राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) आपल्या सैन्याला आणि नागरिकांना सतत धीर देत आहेत. आपल्या प्रेरणादायी भाषणांनी ते जगभरातील लोकांची मने जिंकत आहेत. राजधानी किव्हमधील लष्करी रुग्णालयात झेलेन्स्की पोहोचले. येथे त्यांनी रशियाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिकांची भेट घेतली. संरक्षण मंत्रालयाने राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांच्या या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Russia Ukraine Crisis Ukrainian President Volodymyr Zelenky Meet Injured Soldiers In Hospital)

हेही वाचा: Russia Ukraine Crisis | रशियाची मदत जर चीनने केली, तर... अमेरिकेचा इशारा

त्यात ते एका सैनिकाबरोबर सेल्फी घेताना दिसत आहेत. या प्रसंगी त्यांनी सैनिकांचा उत्साह वाढविला. मित्रांनो ! लवकर बरे व्हा. मला खात्री आहे की तुम्ही जे काही देशासाठी केले आहे, त्याची सर्वोत्तम भेट हा आपला विजय असेल, असा आशावाद युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Russia-Ukraine Conflict: जवानांची भूक भागवणाऱ्या युक्रेनी महिला

मात्र किव्हमधील कोणत्या रुग्णालयाला त्यांनी भेट दिली आहे. हे मात्र स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडियावर झेलेन्स्की यांच्या भेटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title: Russia Ukraine Crisis Ukrainian President Volodymyr Zelenky Meet Injured Soldiers In Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top