११ वर्षाच्या मुलाने केला १००० किलोमीटर प्रवास, युक्रेनमध्ये आई-वडिल अडकले

रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरु असलेल्या युद्धात ११ वर्षांचा एक युक्रेनियन मुलगा स्वतः एक हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करुन सुरक्षितपणे स्लोव्हाकियात पोहोचला आहे.
Ukraine News
Ukraine Newsesakal

रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरु असलेल्या युद्धात ११ वर्षांचा एक युक्रेनियन मुलगा स्वतः एक हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करुन सुरक्षितपणे स्लोव्हाकियात पोहोचला आहे. वेगवेगळ्या वृत्तांनुसार त्याच्या खांद्यावर एक बॅग, त्याच्या आईचे पत्र आणि एक महत्त्वाचा मोबाईल क्रमांक लिहिला गेला होता. (Russia Ukraine War)

मुलाचे होतोय कौतुक

११ वर्षांचा मुलगा दक्षिण-पूर्व युक्रेनच्या झापोरिझ्झिया येथील रहिवाशी होता. जेथे गेल्या आठवड्यात रशियन सैन्याने ताबा मिळविला होता. वृत्तांनुसार आजारी नातेवाईकाचे देखभाल करण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना युक्रेनमध्ये राहावे लागले. हा कठिण प्रवास पूर्ण केल्यानंतर मुलाचे निरागस हसू , निर्भीड आणि दृढ संकल्पासाठी कौतुक होत आहे. स्लोव्हाकिया गृह मंत्रालयाने एका फेसबुक पोस्टमध्ये मुलाला सर्वात मोठा हिरो म्हटले आहे. (Russia Ukraine War 11 Years Old Boy Crossed One Thousand Kilometer Distance)

Ukraine News
युक्रेन-रशिया युद्धामळे इजिप्त, तुर्कस्तान, लेबनाॅनमध्ये अन्नधान्याची टंचाई

स्लोव्हाकिया सरकारने मुलाला नातेवाईकांना भेटवले

वृतांनुसार मुलाच्या आईने त्याला नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेतून स्लोव्हाकियाला पाठविले होते. स्लोव्हाकिया पोहोचल्यावर सीमेवरील अधिकाऱ्यांनी त्याला स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लावामध्ये राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचविले. मुलाच्या आईने स्लोव्हा किया सरकार आणि अधिकाऱ्यांचे त्याची देखभाल करण्यासाठी आभार मानले होते. स्लोव्हाकियाच्या गृहमंत्रालयाने मुलाला शूर म्हणत त्याचे कौतुक केले आहे. मंत्रालय म्हणाले, तो एकटाच आला होता. कारण त्याच्या आई-वडिलांना युक्रेनमध्ये रहावे लागले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com