
'नाटो अन् रशिया भिडले तर…'; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा गंभीर इशारा
रशिया युक्रेन यांच्यामघ्ये मागील 17 दिवसांपासून युध्द सुरु आहे. यादरम्यान सगळ्या जगाचे लक्ष या युध्दाकडे लागले असताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी एक गंभीर इशार दिला. त्यांनी रशियाने युक्रेनमध्ये रासायनिक शस्त्रे वापरल्यास मोठी किंमत मोजावी लागेल असा थेट इशार त्यांनी दिला, तसेच रशियाने तिसऱ्या महायुद्धाला चिथावणी देऊ नये असे असे देखील त्यांनी बजावले आहे.
रशियाने युक्रेन आणि अमेरिकेवर जैविक आणि रासायनिक शस्त्रे विकसित केल्याचा आरोप केल्यानंतर बिडेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की पाश्चात्य राष्ट्रांचे म्हणणे आहे, की युध्दात रशिया स्वत: च्या संभाव्य वापरासाठी आधार घालण्याच्या प्रयत्नाचा हा एक प्रयत्न आहे. ते म्हणाले की, जर त्यांनी रसायने वापरली तर रशियाला मोठी किंमत मोजावी लागेल, असे मॉस्कोविरुद्ध नवीन निर्बंधांची घोषणा करताना बिडेन म्हणाले.
रशियाच्या विनंतीनुसार, युक्रेनमध्ये जैविक शस्त्रांच्या कथित निर्मितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद शुक्रवारी तातडीची बैठक घेत आहे. युक्रेनवरील आक्रमणानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव वाढवून रशियाबरोबरचे सामान्य व्यापार संबंध संपुष्टात आणण्यासाठी बिडेन निर्णय घेतील. दरम्यान अमेरिका इतर पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणे, युक्रेनला विमानविरोधी आणि रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे, तसेच गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी लाखो डॉलर्सची मदत पाठवत आहे.
हेही वाचा: यूपीमध्ये तब्बल 80% नेत्यांचे डिपॉझिट जप्त; काँग्रेस सगळ्यात पुढे
परंतु बिडेन यांनी अनेक युक्रेनियन लोकांच्या विनंत्यांनंतर देखील अमेरिकन सैन्य युक्रेनमध्ये लढणार नाही असे सांगितले, ते म्हणाले की, आम्ही युक्रेनमध्ये रशियाविरूद्ध युद्ध लढणार नाही. नाटो आणि रशिया यांच्यातील थेट संघर्ष हे तिसरे महायुद्ध असेल, असा इशारा त्यांनी दिला. सोबतच हे तिसरे महायुध्द रोखण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे असे देखील ते म्हणाले.
हेही वाचा: कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पाहा देशातील पेट्रोल, डिझेलचे दर
दरम्यान 2018 मध्ये, रशियाने युक्रेनप्रमाणेच नाटो आणि युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या जॉर्जियामधील प्रयोगशाळेत गुप्तपणे जैविक शस्त्रांचे प्रयोग केल्याचा युनायटेड स्टेट्सवर आरोप केला होता.
हेही वाचा: Maruti ची आणखी एक CNG कार लॉंच, देते जबरदस्त मायलेज; पाहा किंमत
Web Title: Russia Ukraine War Joe Biden Warns Direct Nato Russia Clash Is Trigger World War 3
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..