
रशिया युक्रेन युद्ध आणखीच भडकले आहे. रशियाने पूर्व युक्रेन एका मोठ्या कॉलनीवर हल्ला चढवून ताबा मिळवला आहे. रशियाने दावा केला आहे की त्यांच्या सैन्याने पूर्व युक्रेनच्या डोनेस्तकमधील स्टाराया निकोलायेव्का नावाची एक महत्त्वाचा परिसर पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. रशियन संरक्षण मंत्राल्याच्या म्हणण्यानुसार,ही कारवाई गेल्या २४ तासांत करण्यात आली, ज्यामध्ये सुमारे १४७५ युक्रेनियन सैनिक मारले गेले.