

Russia Ukraine War
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्को आणि आसपासच्या भागांना लक्ष्य करत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यांपैकी एक केल्याचा दावा रशियन अधिकाऱ्यांनी केला आहे. या हल्ल्यात १००० हून अधिक ड्रोनचा वापर झाल्याचे सांगण्यात येत असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मॉस्कोतील प्रमुख तेल शुद्धीकरण कारखान्याचेही नुकसान झाले आहे.