Karnataka : गृहमंत्री अमित शाह कर्नाटक दौऱ्यावर, मंत्रीमंडळात होणार फेरबदल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah to Visit Bangalore

पुढील वर्षी कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

गृहमंत्री अमित शाह कर्नाटक दौऱ्यावर, मंत्रीमंडळात होणार फेरबदल?

बंगळुरु (कर्नाटक) : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी पदभार स्वीकारून केवळ नऊ महिने झाले आहेत, तरी राज्यात पुन्हा एकदा नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झालीय. माजी मुख्यमंत्री बी. येडियुराप्पा (B. Yeddyurappa) यांच्या जागी त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली होती. मात्र, भाजपच्या (BJP) नेत्यांनी याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीय. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या बंगळुरू दौऱ्यामुळं या अटकळांना अधिकच उधाण आलंय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पुढील वर्षी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका (Karnataka Assembly Election) होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, भाजप हायकमांडकडं (BJP High Command) याबाबत काय निर्णय घेणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अमित शाह यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याच नेतृत्वाखाली पुढील विधानसभा निवडणुका लढण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची अपेक्षा पक्षाच्या काही नेत्यांनी व्यक्त केलीय. या दौऱ्यात शाह भाजपच्या निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेणार आहेत. तसेच पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना याबाबत काही संदेश देखील देण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शाह यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटक राज्यात 150 जागांचं लक्ष्य ठेवलं होतं.

हेही वाचा: कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करणार : शंभूराज देसाई

बोम्मई हेच मुख्यमंत्रीपदी राहतील : अरुण सिंग

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पायउतारची कोणतीही शक्यता नाही. तेच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील, असं भाजपचे राज्य सचिव अरुण सिंग यांनी काल (ता. ३) स्पष्ट केलं. यामुळं काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू होती. त्याला पूर्वविराम मिळालाय. भाजप नेते आमदार बसवराज यत्नाळ-पाटील यांनी येत्या १० मेपूर्वी राज्यात फेरबदल शक्य आहे. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे, असा दावा प्रसारमाध्यमापुढं केला होता. यामुळं चांगलीच खळबळ उडाली. राजकीयस्तरावर उलटसुलट चर्चाला उधाण आलंय. यामुळं या संदर्भात अरुण सिंग यांनी आज स्पष्टीकरण दिलंय. मात्र, आता भाजप हायकमांड कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Web Title: Cabinet Reshuffle In Karnataka Amit Shah To Visit Bangalore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top