Russia-Ukraine War : युक्रेनची शार्प शूटर थालिता डो रशियन रॉकेट हल्ल्यात ठार

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Russia-Ukraine War : युक्रेनची शार्प शूटर थालिता डो रशियन रॉकेट हल्ल्यात ठार
Updated on

किव्ह : युक्रेनच्या सैन्यात सामील झालेली ब्राझीलची मॉडेल रशियाच्या हवाई हल्ल्यात ठार झाली आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धात (War) आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये अनेक सामान्य लोकांपासून ते लष्कर आणि नामांकित लोकांचा समावेश आहे. डो थालिता यांच्या नातेवाईकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Ukraine Sharp Shooter Thalita Do Killed In Russian Attack)

Russia-Ukraine War : युक्रेनची शार्प शूटर थालिता डो रशियन रॉकेट हल्ल्यात ठार
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन राजीनामा देण्यास तयार!

थलिता डो (Thalita Do) यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. 30 जून रोजी रशियाने खार्किवमध्ये रॉकेट हल्ला केला होता. यावेळी बंकरला आग लागली. त्यात तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. थालिता डो ही ब्राझीलची रहिवासी होती. मॉडेलिंगमध्ये करिअर केल्यानंतर तिने कायद्याचे शिक्षण घेतले. ISIS विरुद्ध मोर्चा काढण्यासाठी ती कुर्दीश सैन्यात सामील झाली होती. मृत्यू होण्याच्या तीन आठवड्यांपूर्वी ती लढाईसाठी युक्रेनला पोहोचली होती आणि त्यानंतर तिला खार्किवला पाठवण्यात आले.

Russia-Ukraine War : युक्रेनची शार्प शूटर थालिता डो रशियन रॉकेट हल्ल्यात ठार
Kaali Controversy : 'मी सध्या कुठेही सुरक्षित नाही...' लीना मनिमेकलई

रशियाची नजर खार्किववर

खार्किव, युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर असून, रशियाच्या ईशान्य सीमेजवळ आहे. युद्धाच्या इतक्या दिवसांनंतरही रशियाला अद्यापपर्यंत खार्किवर कब्जा करता आलेला नाही. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, 13 एप्रिलपर्यंत युक्रेनमध्ये 1,932 लोक मारले गेले आहेत. रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत 4,521 लोक जखमी झाले आहेत. यापैकी डोनेस्तक आणि लुन्हास्कमध्ये 698 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर युक्रेनच्या ताब्यात असलेल्या भागात 621 लोकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com