युद्धसमाप्तीसाठी काही वर्षेही लागतील - मिर्सिया गेओना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

russia ukraine war update NATO warns that war will take years to end Mircia Geona
युद्धसमाप्तीसाठी काही वर्षेही लागतील - मिर्सिया गेओना

युद्धसमाप्तीसाठी काही वर्षेही लागतील - मिर्सिया गेओना

्किव्ह : युक्रेन युद्ध समाप्त होण्यासाठी कदाचित काही वर्षांचा कालावधीही लागेल, असा इशारा ‘नाटो’ संघटनेचे उप सरचिटणीस मिर्सिया गेओना यांनी दिला आहे. रशिया आणि युक्रेनमधील सध्याच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे. गेओना म्हणाले की,‘‘युक्रेन युद्धात पुढील काही दिवस आणि काही आठवडे हे अत्यंत निर्णायक असतील. मात्र, युद्ध मात्र आणखी बराच काळ लांबण्याचा अंदाज आहे. ते कदाचित काही महिने किंवा काही वर्षही चालेल. अनेक घटकांवर ते अवलंबून असेल. मात्र, युद्धाच्या अंतिम क्षणी युक्रेनचाच विजय होईल, अशी मला आशा आहे.’’ रशियाने युक्रेनमधील हल्ले तीव्र केले असले तरी त्यांना युक्रेनी सैनिकांकडून चिवट प्रतिकार सहन करावा लागत आहे. तसेच, युक्रेनला इतर देशांकडून शस्त्र पुरवठा होत असला तरी त्यांना हवी असलेली विमानांची आणि सैन्याची मदत मिळालेली नाही.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस हे युक्रेनमध्ये अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांना भेटण्यासाठी राजधानी किव्ह येथे आले असतानाच या शहरासह इतर अनेक शहरांवर रशियाने क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला. रशियाच्या या हल्ल्यावर जगभरातून तीव्र टीका होत असली तरी याद्वारे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांना रशियाने एकप्रकारे इशारा दिल्याचे मानले जात आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. मात्र, नागरी वस्त्यांवरही बाँबचा मारा झाला.

ब्रिटिश नागरिक रशियाच्या ताब्यात

युक्रेनमध्ये मदतकार्य करण्यासाठी आलेल्या दोन ब्रिटिश स्वयंसेवकांना रशियाच्या सैनिकांनी आज ताब्यात घेतले. झापोरिझ्झिया या शहराच्या तपास नाक्यावरून या दोघांना ताब्यात घेण्यात आले. हे दोघे जण स्वतंत्रपणे मदतकार्य करत होते. एका आग लागलेल्या घरातून काही जणांना वाचविण्यासाठी ते त्या घराच्या दिशेने जात होते.

युद्धाच्या आघाडीवर

  • रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका महिला पत्रकाराचा मृत्यू.

  • किव्हमधील अनेक इमारतींवर रशियाचे हल्ले

  • मारीउपोलमध्ये अडकून पडलेल्यांच्या सुटकेसाठी युक्रेनचे प्रयत्न

Web Title: Russia Ukraine War Update Nato Warns That War Will Take Years To End Mircia Geona

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top