युक्रेनमध्ये रशियन सैन्याचे मोठे नुकसान, व्लादिमीर पुतीन भडकले

युक्रेन युद्धात रशियन सैन्याचे मोठे नुकसान
Vladimir Putin
Vladimir Putinesaka

माॅस्को : युक्रेन युद्धात रशियन सैन्याचे मोठे नुकसान झाल्याने राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन भडकले असून त्यांनी १५० गुप्तहेरांना नोकरीवरुन काढले आहे. तसेच अनेक गुप्तहेरांना तुरुंगात पाठवले आहे. शोध पत्रकारिता करणारी वृत्तसंस्था 'बेलिंगकॅट'ने आपल्या वृत्तात हा मोठा दावा केला आहे. सर्व गुप्तहेर हे रशियाची (Russia) बदनाम गुप्तचर संस्था एफएसबीचे होते. सोव्हिएत संघाच्या काळात गुप्तचर संस्था केजीबीच्या जागी एफएसबीची स्थापना करण्यात आली आहे. पुतीन हे एकेकाळी केजीबीचे गुप्तहेर राहिले आहेत. वृत्तात म्हटले गेले आहे, की अनेक एफएसबी गुप्तहेरांना तुरुंगात पाठवले गेले आहे. पुतीन यांनी ज्या गुप्तहेरांना नोकरीवरुन काढले आहे, ते पाचव्या तुकडीचे असल्याचे सांगितले जात आहे. (Russia Ukraine War Updates Putin Orders Remove 150 FSB Secret Agents)

Vladimir Putin
श्रीलंकन पंतप्रधानांचे देशाला उद्देशुन संबोधन म्हणाले, तुमच्या आंदोलनामुळे देश....

या विभागाची स्थापना १९९८ साली करण्यात आली होती. त्यावेळी पुतीन हे एफएसबीचे संचालक होते. या विभागाचे काम पूर्व सोव्हिएत संघाच्या देशांमधील हालचालींवर नजर ठेवणे हा उद्देश होता. पाचव्या तुकडीचे प्रमुख ६८ वर्षांचे कर्नल जनरल सर्गेई बेसेदा यांना इतर लोकांसह नजरकैदेत ठेवले गेले आहे. त्यांना आता कुप्रसिद्ध तुरुंग लेफोर्टोव्होमध्ये ठेवले गेले आहे. युक्रेनमध्ये (Ukraine) गुप्त माहिती जमा करण्यात यशस्वी न ठरल्याने बेसेदा यांच्याविरुद्ध सुनावणी होऊ शकते, असा दावा केला गेला आहे.

Vladimir Putin
रशिया-युक्रेन युद्ध संपल्यानंतर महागाई कमी होण्याचे संकेत

रशियन राष्ट्रपती कार्यालयाला खोटी माहिती दिली

'बेलिंगकॅट'चे संचालक ख्रिस्तो ग्रोजेव यांनी दावा केला, की या गुप्तहेरांनी रशियाच्या हल्ल्यापूर्वी युक्रेनच्या स्थितीची रशियन राष्ट्रपती कार्यालयाला खोटी माहिती दिल्याने त्यांना नोकरीवरुन काढण्यात आले आहे. ग्रोजेव म्हणाले, मात्र जास्त लोकांना अटक करण्यात आलेली नसून आता ते एफएसबीसाठी कार करु शकणार नाही. जर रशियन सैन्याने हल्ला केल्यास मोठ्या संख्येने युक्रेनचे लोक त्याचा स्वागत करतील, असे गुप्तचर संस्थांनी पुतीन (Vladimir Putin) यांनी सांगितले होते. मात्र वास्तवात घडले उलटे.

Vladimir Putin
रशिया-युक्रेन युद्ध संपल्यानंतर महागाई कमी होण्याचे संकेत

हजारो रशियन सैन्य मारले गेले आहेत. ४० दिवसांपेक्षा अधिक दिवस युद्धाला झाले आहेत. मात्र कोणतेही यश अद्यापही मिळालेले नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्षाने दावा केला, की जवळपास २० हजार रशियन सैनिक आतापर्यंत मारले गेले आहेत. या गुप्तहेरांना हटवल्यानंतर इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पुतीन कारवाई करु शकतात, असे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com