Russia vs Ukraine : रशियाची माघार! खारकीव्ह शहरावर पुन्हा युक्रेनचा ताबा

Ukraine and Russia crisis Zaporizhia project will inspected
Ukraine and Russia crisis Zaporizhia project will inspectedsakal

Russia vs Ukraine : रशिया युक्रेन युद्धाला जवळपास सहा महिने उलटून गेले तरी कुणीच माघार घ्यायला तयार नाही.. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असून प्रतिहल्ल्यामुळे युक्रेनमधील दुसरे महत्त्वाचे शहर असलेल्या खारकीव्हमधून रशियाला सैन्य माघारी घेण्याची वेळ आली आहे. युक्रेनच्या जोरदार प्रतिहल्ल्यामुळे रशियाचे सैन्य टिकाव धरू शकले नसल्याने रशियाला युक्रेनकडून मोठा धक्का बसला आहे.

(Russia Ukraine Crisis Latest Updates)

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून युक्रेन सैन्यांची अत्यंत जलद आगेकूच सुरू असून युद्धाची चित्रे पालटण्याची शक्यता आहे. युक्रेनी सैन्यांनी प्रतिकार करताना खारकीवचे तळ आणि मार्ग पुन्हा ताब्यात घेतल्याने कोंडी होऊ नये यासाठी रशियाने आपले सैन्य मागे घेतले आहे. हे युक्रेनच्या सैन्यांचं सर्वांत मोठं यश मानलं जात असून पुतीन यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Ukraine and Russia crisis Zaporizhia project will inspected
Laser Show: गणेशोत्सवातील लेझर शो घातक; कोल्हापुरात 63 जणांच्या डोळ्याला इजा

फेब्रुवारीमध्ये हल्ला केल्यानंतर काही दिवसांतच युक्रेनचा ताबा हातात येण्याची अपेक्षा असलेल्या रशियाला युक्रेनी सैनिकांच्या चिवट प्रतिकारामुळे आणि उर्वरित जगाने टाकलेल्या निर्बंधांमुळे मर्यादित यश मिळाले आहे. युद्धाला सहा महिने उलटून गेल्यानंतरही रशियाला युक्रेनचा पूर्वेकडील भाग आणि दक्षिणेकडील काही भाग ताब्यात घेता आला आहे. मात्र, युक्रेनी सैनिकांनी ऑगस्टच्या अखेरपासून सुरु केलेल्या प्रतिहल्ल्यांमुळे हा ताब्यात आलेला भागही आता रशियाच्या हातून निसटून चालला असल्याचे चित्र आहे. युक्रेनी सैनिकांनी केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे रशियावर खारकिव्ह या मोठ्या शहरातून सैन्यमाघारी जाहीर करण्याची नामुष्की ओढविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com