esakal | रशियाचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट; उभारणार स्वत:चं स्पेस स्टेशन

बोलून बातमी शोधा

Space Station

१९९८ पासून अमेरिका आणि इतर १६ देशांसोबत रशियाच्या अंतराळवीरांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर काम पाहिले आहे. मॉस्को आणि वॉशिंग्टन म्हणजे रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होण्याचे हे एक प्रमुख कारण ठरले.

रशियाचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट; उभारणार स्वत:चं स्पेस स्टेशन
sakal_logo
By
वृत्तसंस्था

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी परवानगी दिल्यास २०३० पर्यंत रशिया स्वत:चं अंतराळ स्थानक उभारेल, अशी माहिती रशियाची अंतराळ संस्था रॉसकॉसमॉसच्या प्रमुखांनी बुधवारी (ता.२१) दिली. या प्रकल्पाद्वारे रशिया अंतराळ संशोधनात नवा अध्याय लिहणार आहे. दोन दशकांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (International Space Station) सहकारी असलेल्या अमेरिकेचा याद्वारे निरोप घेणार आहे.

हेही वाचा: नवऱ्याला घटस्फोट देत थाटला सासऱ्यासोबत संसार

'जर २०३० पर्यंत आम्ही ठरवलेल्या योजनांना अंतराळात यश मिळाले, तर हा खूप मोठा विजय ठरेल. जागतिक अवकाश संशोधनात नवे पाऊल टाकण्याची आमची इच्छाशक्ती आहे,' असे मत रॉसकॉसमॉसचे प्रमुख दिमित्री रोगोजिन यांनी व्यक्त केले. याबाबतचं वृत्त इंटरफॅक्स न्यूज एजन्सीनं दिलं आहे.

१९९८ पासून अमेरिका आणि इतर १६ देशांसोबत रशियाच्या अंतराळवीरांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर काम पाहिले आहे. मॉस्को आणि वॉशिंग्टन म्हणजे रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होण्याचे हे एक प्रमुख कारण ठरले. रशिया २०२५ पर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडण्याबाबतचा निर्णय आपल्या सहकाऱ्यांना कळवेल, अशी माहिती रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसोव्ह यांनी एका रशियन टीव्हीला दिली आहे.

हेही वाचा: भारताला 'अम्फन' वादळ पडले १४ अब्ज डॉलरला; UNचा अहवाल

रोगोझिनने म्हटलं की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापेक्षा रशियाचं स्पेस स्टेशन वेगळं असेल. तिथं कायमस्वरुपी क्रू मेंबर्स नसतील. कारण हायर रेडिएशनचा जास्त प्रभाव राहील. मात्र कॉस्मोनॉटस् (Cosmonauts) तिथं जाऊ शकतील. रशियाच्या या स्पेस स्टेशनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि यंत्रमानव (Robots) यांचा वापर केला जाणार आहे. परदेशी कर्मचाऱ्यांना भेट देण्यास तिथं मुभा असेल, पण त्यावर फक्त रशियाचा हक्क राहील.

या प्रकल्पासाठी रशियाने तब्बल ६ अब्ज डॉलर्सचा निधी खर्च करण्याची तयारी केली आहे, अशी माहिती इंटरफॅक्सने दिली आहे.