Vladimir Putin येणार भारत दौऱ्यावर; संरक्षणाशी निगडीत करारांवर होणार चर्चा

narendra modi and vladimir putin meet deal on s 400 might be singed
narendra modi and vladimir putin meet deal on s 400 might be singed

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 6 डिसेंबर रोजी भारतात येत आहेत. या दरम्यान भारत आणि रशियाच्या दरम्यान अनेक संरक्षण करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. या करारांमुळे पाकिस्तान आणि चीनच्या चिंतेत वाढ होऊ शकते. रशियन राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्याआधीच सरकारने एक मोठं पाऊल उचलत उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये 5 लाखाहून अधिक एके-203 असॉल्ट रायफलच्या निर्मितीला परवानगी दिली आहे. या रायफलची निर्मिती भारत-रशियाच्या परियोजनेअंतर्गत केली जाणार आहे.

narendra modi and vladimir putin meet deal on s 400 might be singed
कर्नाटकनंतर गुजरातमध्ये आढळला ओमिक्रॉनचा रूग्ण; चिंता वाढली

रशियन राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान 'AK-203' कलाशनिकोव रायफल खरेदी करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक महिन्यांपासून हा करार प्रलंबित आहे. भारत आणि रशिया दरम्यानच्या या AK-203 रायफलच्या कराराबाबतची सहमती काही वर्षांपूर्वीच झाली होती. या कराराअंतर्गत भारताला 7.5 लाख AK-203 कलाशनिकोव रायफल मिळण्याची शक्यता आहे.

narendra modi and vladimir putin meet deal on s 400 might be singed
स्वातंत्र्यलढ्यात भाजप-संघाचं काय योगदान? मलिकांचा सवाल

अमेठीत होईल पाच लाख रायफल्सची निर्मिती

पुतीन यांच्या भारत दौऱ्याआधीच केंद्र सरकारने उत्तर प्रदेशमधील अमेठीमधील कोरवामध्ये पाच लाखांहून अधिक AK-203 असॉल्ट रायफलच्या निर्मितीच्या योजनेला मंजूरी दिली आहे. हे एक संरक्षण क्षेत्रामधील मोठं पाऊल मानलं जात आहे. रशियासोबत झालेला या करारामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमध्ये चांगलं नातं निर्माण झाल्याची ही चिन्हे मानली जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com