स्वातंत्र्यलढ्यात भाजप-संघाचं काय योगदान?  मलिकांचा सवाल

स्वातंत्र्यलढ्यात भाजप-संघाचं काय योगदान? मलिकांचा सवाल

देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीकेच्या स्वरुपात होतं. असं वक्तव्य करुन देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्री कंगनावर मलिक यांनी परखड शब्दांत टीका केली आहे.

देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीकेच्या स्वरुपात होतं. असं वक्तव्य करुन देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्री कंगनावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी परखड शब्दांत टीका केली आहे. सकाळच्या वतीनं त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी देशातील सध्याचे वातावरण, जाणीवपूर्वक केला जाणारा अपप्रचार आणि त्यासोबत तरुणाईला भरकटवून टाकण्याचे कमा केले जात असल्याचे मलिक यांनी सांगितलं आहे. सध्या सगळं वेल प्लॅन सुरू आहे. कंगनाला ज्यांनी पुरस्कार दिला ते परत घेतील याची शक्यता कमी आहे. तिच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत कारवाई होईल. जर कुणी हिमाचल मध्ये लपून बसून असेल तर त्याच्यावर कारवाई करायला तर वेळ लागतो ना ? अशी टिप्पणी मलिक यांनी कंगनावर केली.

मलिक म्हणाले, या देशामध्ये एक वेगळी विचारधारा पेरण्याचे काम सुरु आहे. आपल्याला असं सांगण्यात आलं आहे की, 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालें आहे. एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यतच्या स्वातंत्र्य संग्रामात भाजपचे काय योगदान आहे हा माझा प्रश्न आहे. संघानं देखील या संग्रामात कधीही भाग घेतलेला नाही. याउलट त्यांनी इंग्रजाच्याविरोधात भूमिका घेतली होती. आपण यासंबंधी गोळवलर गुरुजी यांची पुस्तकं आणि लेख वाचू शकतो. थोडक्यात स्वातंत्र्य संग्रामात यांचे काही योगदान नाही. त्यामुळे महात्मा गांधी, पंडित नेहरु यासारख्या नेत्यांच्या यादीत त्यांची नावं कुठचं नाही.

वेगळी विचारसरणी निर्माण करण्याचे काम सध्या सुरु आहे. नव्या पिढीसाठी हे धोकादायक आहे. कंगना जे बोलली तिच्यासारखे अनेकजण बोलत असतात. सध्या इंटरनेटवर आपण काही सर्च केलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विषय समोर येताना दिसत आहेत. विकीपिडियाच्या माध्यमातून नवा इतिहास आपल्यापुढे येत आहे. त्यांना असं वाटतं आहे की, आपण जर अशाप्रकारे काही सांगत राहिलो तर दहा वीस वर्षानंतर आपण जे सांगितलं आहे ते खरं वाटायला लागेल. मला असे वाटते की, हे सगळं ठरवून केलं जातं आहे. हा पद्धतशीर आखलेला डाव आहे. कंगनानं जे वक्तव्य केलं आहे त्यावर तिच्यावर कारवाई देखील होईलं. असंही मलिक यांनी यावेळी सांगितलं.

स्वातंत्र्यलढ्यात भाजप-संघाचं काय योगदान?  मलिकांचा सवाल
Money Heist 5 Review; 'शेवटी प्रोफेसर जिंकले की हरले'?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com