
रशियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका शाळेतील विवाहित शिक्षिकेवर ११ वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २७ वर्षीय अन्ना प्लाक्स्युकवर एका मुलासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, तिने अल्पवयीन विद्यार्थ्याला स्वतःचे नग्न फोटो दाखवले. त्याला तिच्या स्तनांना स्पर्श करण्यास आणि तिचे चुंबन घेण्यास भाग पाडले. अन्नाने सर्व आरोप स्वीकारले. तिने दावा केला की, विद्यार्थ्याचे तिच्याबद्दलचे कौतुक ऐकल्यानंतर ती तिच्याकडे आकर्षित झाली. न्यायालयाने तिला ९ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.