रवांडा हत्याकांडाचा प्रमुख संशयित अटकेत

पीटीआय
रविवार, 17 मे 2020

५० लाख डॉलर इनाम
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार लवादाने काबुगो याच्यावर वांशिक हत्याकांड घडवून आणल्याचा आणि मानवतेविरोधात गुन्हा केल्याचा आरोप ठेवला आहे. काबुगो याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास ५० लाख डॉलरचे इनाम अमेरिकेने जाहीर केले होते.

पॅरिस - आफ्रिकेतील रवांडा देशात नव्वदच्या दशकात झालेल्या क्रूर वांशिक हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी फेलिसियन काबुगा (वय ८४) याला आज फ्रान्स पोलिसांनी अटक केली. हे वांशिक हत्याकांड घडवून आणणाऱ्या हल्लेखोर गटांना काबुगा याने निधी पुरविल्याचा आरोप आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याच्यावर आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालविला जाण्याची शक्यता आहे. उद्योगपती असलेला काबुगा हा पॅरिसनजीक ओळख लपवून निर्माण करून वास्तव्य करत होता. 

रवांडामध्ये ७ एप्रिल ते १५ जुलै १९९४ या कालावधीत रवांडामध्ये झालेल्या वांशिक हत्याकांडाने संपूर्ण जग हादरुन गेले होते. तरीही, कोणत्याही देशाने त्यात हस्तक्षेप केला नव्हता. १९९० मध्ये युगांडामधून आलेल्या तुत्सी समुदायाला हुतू या समुदायातील कट्टरतावादी गटाने विरोध करत त्यांचे हत्यांकांड घडवून आणले होते.

युरोपीयन राष्ट्र कोरोनामुक्त! हा आहे लॉकडाउन हटवणारा जगातील पहिला देश

अनेकांना त्यांच्या घरात घुसून, शोधून काढत मारून टाकण्यात आले होते. या हत्याकांडात रवांडामधील ७० टक्के तुत्सी लोकांचा, म्हणजे जवळपास आठ लाख लोकांचा बळी गेला होता. काबुगो हा हुतू समुदायाचा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rwanda massacre suspect arrested