S.Jaishankar: पाणीपुरीची युरोपला भुरळ? परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणतात, "आपके मुंह मे घी शक्कर"

S. Jaishankar
S. Jaishankaresakal

S. Jaishankar: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज बांगलादेश, स्वीडन आणि बेल्जियमच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर रवाना आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर द्विपक्षीय आणि बहुपक्षीय फ्रेमवर्क अंतर्गत तिन्ही देशांसोबत भारताची प्रतिबद्धता आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील.

परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या भेटीची माहिती दिली आहे. त्यांच्या दौऱ्यात ते आज इंडो-पॅसिफिक मिनिस्ट्रिअल फोरम मध्ये सहभागी झाले यावेळी एस जयशंकर यांना एका पत्रकाराने एक विनोदी प्रश्न केला जेथे त्यांनी भारतीय स्ट्रीट फूड 'पाणीपुरी'चा उल्लेख केला. Marathi Tajya Batmya

S. Jaishankar
उद्धव ठाकरेंच्या मर्यादा सांगणारे पवारांच्या पुस्तकातले 'ते' 10 वाक्य; फडणवीसांनी वाचून दाखवले

त्यांनी विचारलं की, पश्चिमेतील भारतीय संस्कृतीचा प्रभाव वाढला आहे या वाढत्या प्रभावामुळे 'पाणीपुरी' हा पदार्थ स्ट्रीट फूड म्हणून हॅम्बर्गरची जागा घेईल का? पत्रकाराच्या या प्रश्नाला उत्तर देताना, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 'आपके मुह में घी-शक्कर' हा लोकप्रिय हिंदी वाक्यप्रचार वापरला, या वाक्यामुळे तेथे उपस्थित भारतीय नागरिकांमध्ये हशा पिकला.

S. Jaishankar
BRS: "काना मागून आली अन् तिखट झाली.." मविआ, महायुतीला धक्का देण्यासाठी 'हा' पक्ष सज्ज

जयशंकर यांनी पुढं भारतात होत असलेल्या परिवर्तनाबद्दल आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी निर्माण केलेल्या संधींबद्दल सांगितले. "भारतीय संस्कृतीचे हे जागतिकीकरण घडताना मी प्रत्यक्षात पाहतो आहे. आणि हे विविध कारणांमुळे घडत आहे. Latest Marathi News

अर्थातच, डायस्पोरा पसरल्यामुळे आहे. दुसरे म्हणजे आपण स्वतः, मला वाटते, अधिक आत्मविश्वासाने आहोत. ते व्यक्त करणे. भारतीय संस्कृतीचे जागतिकीकरण अधिक सार्वत्रिक बनवण्याचे मार्ग शोधण्याचा आपण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com